"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Tuesday, December 24, 2024

मी देव पाहीला

 

     एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला.

*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता. 


हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. 

दिवसा कधी दिसत नसायचा. 

खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. 

मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ. 

         

*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. 

मी त्या मंदिराकडे आलो. 

तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मंदिराच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला. 

मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.

मला बघून तो गालातल्या गालात  *हसला.* 

जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 


सर माझ्या *घरात लाईट* नाही. 

माझी *आई आजारी* असते. 

दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास  करायला. माझी *ऐपत* नाही.


बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ? 


सर तुम्ही *देव* आहात !


नाही रे! 


सर तुम्ही माझ्या साठी *देवच* आहात. 


ते जाऊदे तू *जेवलास* का? 

मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे. 


सर म्हणूनच मी *हसलो.* 

मला माहित होतं. 

तो ( देव ) कोणत्याही *रूपात* येइल पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार. 

मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, तो काहींना काही मला *देतोच.* 

कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* तो मला देऊन जातो. 

आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो. 

मला माहित होतं....तो काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.

तुम्ही *देव* आहात ना !


मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं. 

रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *देवाला* कोसत होतो. त्याने आज मला *देवाची उपाधी* देऊन लाजवलं होतं.


 त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.

माझे डोळे *तरळले.*

त्याला काही विचारण्या  अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. 

त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती. 

सर, 

माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.


क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *पाषाणाकडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटलं. 


नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.

*शाळा, कॉलेज, मंदिर बंद* झाले. 

देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर  *शुकशुकाट* झाला.

असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *देवळाकडे* डोकावलं.

रात्रीची वेळ होती.

देवळाची पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही. 

वाईट वाटलं मला.  

या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?

काय खात असेल ?

कसा जगत असेल ?

असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले. 


कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले. 

असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला. 

मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.

सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो. 

पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे*  धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

सर .... 


अरे तू *इथे* काय करतोस ? 

सर आता मी *इथेच राहतो.* 

आम्ही घर बदललं.

*भाडं* भरायला पैसे नव्हते. 

त्यातच लॉकडाऊन मध्ये *शिव* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.

 

मग मला घेऊन आई इथे आली. 

काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे. 

त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत. 

तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.* 

ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.

 

सर मी *हार* नाही मानली. 

*आई* सांगायची........

ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार. 


बरं..... तुझी आई कुठे आहे ? 

सर ती *कोरोनाच्या आजारात *गेली.

तीन दिवस ताप खोकला होता. 

नंतर दम अडकला. 

मी कुठे गेलो नाही.  

इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला. 

१४ दिवस इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.

*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.

*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं. 

          

सर तरी मी हरलेलो* नाही पण दुःख एव्हढच आहे की मी *पास झालेलो पहायला आई* ह्या जगात *नाही.

ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश असेल हे माझं यश* बघून.  

कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय. 

आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. 

*ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही. 


असो सर, 

तुम्ही का वाईट वाटून घेता ? 

तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ? 

सर, 

तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा. 


त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.

चिमूटभर  माझ्या हातावर ठेवली. 

सर *तोंड गोड* करा. 


तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.

*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*

सर, मला माहीत होते, *देव* या जगात आहे आणि तो माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार. 

त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो. 

आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......

न सांगता. 


खरा देव तर कधीच नाही दिसला पण, 

मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ....

 

देव पाहिला....


       🙏 धन्यवाद !! 🙏


हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं.. 

Saturday, December 14, 2024

दत्तजयंतीच्या शुभेच्छा...

  


 दत्तरूपी गुरुतत्त्वाचे महात्म्य 

   ‘दत्तजयंती’ म्हणजे त्रिदेवस्वरूप दत्तगुरूंचा अवतरणदिन ! शिष्याचे अज्ञान नष्ट करणे, हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. अज्ञानी जिवांना ज्ञान प्रदान करण्यासाठी भगवंतच श्रीदत्त प्रभूंच्या रूपाने योग्य वेळी प्रकट होतो आणि त्या जीवांवर कृपा करून त्यांना आत्मबोध करतो. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन:पुन्हा अवतरित होत असतात. म्हणूनच भक्तांसाठी ‘दत्तजयंती’ हा केवळ श्रीदत्तगुरूंचा उत्सव नसून गुरुतत्त्वाचा उत्सव आहे.  या भक्तीसत्संगाद्वारे दत्तरूपी गुरुतत्त्व अनुभवूया.


Sunday, December 1, 2024

जागतिक एड्स दिन

 दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस 'जागतिक एड्स दिन' म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स (AIDS - Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO) घोषित केले आहे. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. 

Friday, November 22, 2024

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

 

२१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस. त्यांच्या कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्‍याचा दिवस. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीपुढे झुकावे लागले. या हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर सरकारला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागले. २१ नोव्हेंबर १९५६ ला फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. या निर्णया मुळे मराठी माणूस पेटून उठला होता. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला जात होता. कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोरील चौका कडे कूच करत होता. प्रचंड जनसमुदाय एका बाजुने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजुने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे निघाला. या मोर्चाला उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मात्र, अढळ सत्याग्रहींपुढे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले. १०६ जणांनी आपला प्राण गमवला. त्यानंतर या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र साठी ज्या १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान केले त्या सर्वांना विनम्र अभिवादन.


Monday, November 11, 2024

राष्ट्रीय शिक्षण दिन

  ११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री 

मौलाना अबुल कलाम आझाद    यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात. 

    शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात. मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांनी दिनांक १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ या काळात शिक्षणमंत्री म्हणून देशाची सेवा केली. त्यांचा सन्मान करीत सन २००८ पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. देशात IIT, IISc आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. AICTE आणि UGC सारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते प्रमुख व्यक्ती होते. विनामूल्य प्राथमिक शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची स्थापना केली. ललित कला अकॅडमी, साहित्य अकादमी आणि अश्या बर्‍याच शैक्षणिक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. व्यवसायिक प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिला.

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मी देव पाहीला

       एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. ...