आगतम - स्वागतम - सुस्वागतम !
हिरे माणिक सोने उधळा जय जय कर करा...
सुख दुःखाच्या वादळात हा गरीबाचा वाली...
महाराष्ट्राचा उद्धारक तू जनतेचा राजा तू...
जय राजश्री शाहू राजा तुला हा मानाचा मुजरा..!
मी ........... सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो !
राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे गावात घराण्यात झाला महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला . त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली, अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांचा वेगळ्या शाळा भरण्याची दृष्टी पद्धत 1919 मध्ये बंद केली. अशा या जाणत्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण जमलो आहोत .
★ स्थानापन्न करणे :-
पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते !
चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणूनच तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते!
असेच प्रेम आपुलकी जिव्हाळा जपणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे श्री ------------ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो !
★ कार्यक्रमाचे अध्यक्ष :-
ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन आनंदाने उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते!
म्हणून सकारात्मक आशावादी आणि विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. अशा गुरुकिल्ली लिहिणारे आपले मार्गदर्शक श्री..................... हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो !
★ *प्रमुख पाहुणे :-
तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी पुरुष प्रधान संस्कृती आपल्या कार्यामुळे वेगळेपण जोपासलेल्या............... आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.............. हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो!
★ पूजन व दीपप्रज्वलन :~
★ स्वागत/पुष्पगुच्छ :~
★ कार्यक्रमाचे प्रास्ताविक :~
★ प्रास्ताविक :~
★ मार्गदर्शन :~
★ अध्यक्षीय भाषण:~
★ आभार प्रदर्शन :~
No comments:
Post a Comment