गुरुब्रम्हा गुरु विष्णू :
गुरुदेवो महेश्वरायः ।
गुरु साक्षात परब्रम्ह,
तस्मैयश्री गुरवे नमः ।।
गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते.
मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी 2024 साली गुरुपौर्णिमा ही 21 जुलै ला साजरी करत आहो.
महान ऋषी महर्षी वेद व्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ या उत्सवाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात . हिंदू साहित्यातील सर्वात महत्वाचे महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारताची रचना करण्याचे आणि हिंदू धर्मातील सर्वात जुने पवित्र ग्रंथ असलेल्या वेदांचे संकलन करण्याचे श्रेय वेद व्यासांना जाते. भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे.
गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे...
मोल आयुष्याचे जाणून घ्यावे...
गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे...
चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे...
गुरु पौर्णिमेच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम.
मानवी जीवनातील गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरु चे स्थान अतिउच्च आहे.
शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरूच कारणीभूत ठरतो.
भारतासह नेपाळ व जगभरात जिथ जिथे भारतीय राहतात तेथे साजरी केली जाते. हा दिवस शिष्यांसाठी गुरु बद्दल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो. दिवस म्हणून साजरा केला जातो.
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂ शिक्षक एका सुंदर आरशाप्रमाणे असतात. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो. आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बालकाला सर्वात आधी शिक्षण आई-वडिलांकडून दिले जाते. आई हीच त्याला चालणे बोलणे शिकवते. म्हणून आईला बालकाचा पहिला गुरु म्हटले जाते.
अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता.
ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तू' असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरु सजीव मानव रुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान कण वेचले पाहिजे. कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट....?
भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂
★गुरु पौर्णिमा विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रभाव पूर्ण भाषणे साठी क्लिक करा>>>
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂
गुरु पौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे, जो गुरु (शिक्षक) आणि शिष्य (शिष्य) यांच्यातील बंधाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा शुभ दिवस आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेला येतो . हा दिवस आपल्या गुरू आणि मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे, जे आपल्या शहाणपणाने आणि ज्ञानाने आपल्याला जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शन करतात. मराठीत गुरुपौर्णिमा भाषण तयार करताना या दिवसाचे महत्त्व आणि त्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
गुरुपौर्णिमेचा उगम प्राचीन हिंदू परंपरांमध्ये आहे. महान ऋषी महर्षी वेद व्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ या उत्सवाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात . हिंदू साहित्यातील सर्वात महत्वाचे महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारताची रचना करण्याचे आणि हिंदू धर्मातील सर्वात जुने पवित्र ग्रंथ असलेल्या वेदांचे संकलन करण्याचे श्रेय वेद व्यासांना जाते. भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे.
गुरुपौर्णिमेचा गहन आध्यात्मिक अर्थ आहे. पारंपारिक गुरू-शिष्य परंपरेत (शिक्षक-शिष्य परंपरा) गुरूला दैवी ज्ञानाचा वाहक मानले जाते. गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते पवित्र आहे, गुरू हे शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे मार्गदर्शक म्हणून आदरणीय आहेत. कृष्ण आणि अर्जुन आणि द्रोणाचार्य आणि एकलव्य यांसारख्या प्रसिद्ध जोड्या या बंधनाचे उदाहरण देतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, शिष्य त्यांच्या गुरूंचा आदर करतात, आध्यात्मिक आणि शैक्षणिक दोन्ही, आदर आणि भक्तीने, त्यांच्या जीवनाला आकार देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करतात.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व वैयक्तिक गुरू-शिष्य नात्याच्या पलीकडे आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान आणि मूल्ये प्रसारित करण्याचा हा दिवस आहे. अनेक शाळा आणि अध्यात्मिक संस्थांमध्ये, हा दिवस विशेष कार्यक्रमांद्वारे चिन्हांकित केला जातो जेथे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना आदर देतात, विधी करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात..
महाराष्ट्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. लोक मंदिरांना भेट देतात, प्रार्थना करतात आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून आशीर्वाद घेतात. हा चिंतनाचा दिवस आहे, जिथे व्यक्ती त्यांच्या आध्यात्मिक आणि वैयक्तिक वाढीमध्ये त्यांच्या गुरूंच्या अमूल्य योगदानाची कबुली देतात. गुरुपौर्णिमेचा उत्सव आदर, कृतज्ञता आणि नम्रतेची भावना वाढवतो, शिक्षक आपल्या जीवनात महत्त्वाच्या भूमिकेची आठवण करून देतात.
शेवटी, गुरुपौर्णिमा हा अत्यंत आदर आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिलेल्या गुरू-शिष्य परंपरेचा हा उत्सव आहे. वेद व्यासांचे ज्ञान असो , गौतम बुद्धांच्या शिकवणी असोत किंवा आपल्या दैनंदिन शिक्षकांचे मार्गदर्शन असो, गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञान आणि शहाणपणाने आपले मार्ग प्रकाशित करणाऱ्यांचा सन्मान करण्याची आठवण करून देते. आपण हा शुभ दिवस साजरा करत असताना, आपल्या गुरूंनी दिलेल्या धड्यांवर चिंतन करूया आणि त्यांनी दाखवलेल्या नीतिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया.
गुरु म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रुप: या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असो: असा गुरुमहिमा भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे. ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेदिवशी साजरी होते.
व्यास महर्षिंनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. महाभारत काळातील मोठे विद्वान, श्रेष्ठ असे व्यासमुनी होऊन गेले. त्याच्याइतके थोर व्यासंगी, ज्ञानसंपन्न गुरु अद्यापपर्यंत झाले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. राजावाचून सेना, शेतकऱ्यावाचून मळा आणि मंगळ सुत्रावाचून गळा, नावाड्याशिवाय नौका या जशा गोष्टी विसंगत वाटतात त्याप्रमाणे सदगुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच श्री समर्थांनी ‘सदगुरुविणा जन्म निष्फळ’ असे म्हटले आहे.
विद्या हे एक महान दैवत आहे. विद्यादान करण्याचे महान व पवित्र असे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री सरस्वतीची अमृतवाणी, सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार, गुरु म्हणजे दयेचा सागर, केवळ लोकांच्या कल्याणासाठीच झटणारा, निस्वार्थी ज्ञान दान करणारा, गुरुविना कोणाच्याही जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही. कारण दिपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याला सुरक्षितपणे पोहोचवू शकत नाही. कोकिळेच्या आवाजात जरी माधुर्य असले तरी कंठ फुटण्यास जसा वसंत ऋतुच यावा लागतो, त्याप्रमाणे मनुष्याजवळ ज्ञान उपजत असले तरी ते फलद्रुप होण्यासाठी त्याला सद्गुरु पासून चालना मिळावी लागते. लोखंड जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते. त्याप्रमाणे गुरुच्या ज्ञानदानाने शिष्य कृतार्थ होतो.
गुरु म्हणजे ज्ञानाचे पीठ या दिवशी गुरुपूजन करणे म्हणजे सत्याचे ज्ञानाचे पूजन करणे होय. गुरुसारखा पाठीराखा असला तर शिष्याला जीवनात मार्ग सापडतो. गुरुची सुरुवात आईवडीलांपासून होते. आई ही प्रत्येकाची सर्वात मोठी गुरु आहे. आपल्या बाल मनावर अनेक चांगले संस्कार रुजवते, कितीतरी चांगल्या बाबींचे ज्ञान, चांगले विचार व सदाचार आपल्या मनावर बिंबवते, आपण अज्ञानाचे सज्ञान तिच्याच तालमीत होते. प्रेम वात्सल्य ह्या गुणांचा वारसा आपण तिच्याकडूनच उचलतो.
महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार व समाजाचे खरे गुरु होते. जगातील महान साहित्यिक तत्ववेत्ता म्हणून व्यासांची किर्ती आहे. व्यासमुनी शिष्यांना मौनातून ज्ञान द्यायचे. व्यासांनंतर जो शिष्य संप्रदाय तयार झाला. त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा अधिकार देण्यात आला की, त्यांनी मौना ऐवजी मुखवाणीतून शिष्याला ज्ञान द्यावे. तेव्हापासून “गुरुपौर्णिमा” साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. त्या दिवशी गुरुप्रती आपले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा देतात. अर्थात हे सर्व शिष्याच्या अध्यात्मिक उन्नत्तीसाठीच असते.
गुरुपौर्णिमेदिवशी गुरुतत्व हजार पटीने कार्यरत असते. म्हणजे इतर दिवशी गुरुंसाठी काही केल्याने जो फायदा होतो, त्यापेक्षा गुरुपौर्णिमेला हजार पटीने फायदा होतो, हे या दिवसाचे माहात्म्य आहे. समाजात गुरुचे स्थान अतिशय उच्च आहे. म्हणूनच भारतात गुरुची महती रहावी म्हणून "गुरुपौर्णिमा" साजरी करतात.
@@@@#####@@@@
दिशादर्शक बाण असतो गुरु…
संस्काराची खाण असतो गुरु...
प्रगतिचा पंख आसतो गुरु...
कर्तुत्वाच्या रणांगनावरती शंखनाद असतो गुरु...
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो गुरु...
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो गुरु...
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो गुरु...
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो गुरु...
माझ्या आयुष्यातील सर्व लहान - थोर गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!🙏🙏💐💐💐
No comments:
Post a Comment