धरणे आंदोलन सूत्रसंचालन

स्वागतम स्वागतम सुस्वागतम..!!


   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज समानतेच्या तत्त्वावर हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे राजे शिवाजी यांना त्रिवार अभिवादन करून मी सतीश बोरखडे जिल्हा समन्वयक प्राथमिक पदवीधर विषय शिक्षक संघर्ष समिती तर्फे आयोजित 5 सप्टेंबर विषय शिक्षक सरसकट वेतनश्रेणी आंदोलन कार्यक्रमाला सुरुवात करतो...

   ★समान काम समान वेतन, विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी या एकमेव मागणी करीता आंदोलनात सहभागी  असलेले सर्व गणमान्य मान्यवर व उद्याचे प्रगत राष्ट्र घडविण्याचे स्वप्न उराशी बांधून कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू- भगिनींनो...

★ पाहूणे स्थानापन्न करणे ~

"हिऱ्याशिवाय कुंदणाला महत्व नाही... 

गोडीशिवाय ऊसाला महत्व नाही...!! 

सुगधांशिवाय फुलाला महत्व नाही...

तसेच अध्यक्षांशिवाय आंदोलनाला ही महत्व नाही...!!

      म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अध्यक्ष यवतमाळ जिल्हा शिक्षक व कर्मचारी पतसंस्था 109 मा. श्री. महेश सोनेकर यांनी स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.

  अतिथी देवोभव या संस्कृतीचा वारसा जोपासणारे आपण, आणि याच अनुषंगाने अनेक मान्यवर प्रमुख अतिथी विषय शिक्षक आंदोलनाला आपणास लाभलेले आहेत. विनंती करतो की (प्र.अतिथींचे नावे)आपण सर्वांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावे... व कार्यक्रमाची शोभा वाढववी...  

★ प्रतिमा पूजन /दीप प्रज्वलन ~

आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले व आज... शिक्षक दिन'

देशाचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांनी करावे.

◆ सुमंगल या वातावरणात

संचारुनी आली देशभक्ती
मान्यवराच्या  शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्योती....

 स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं.... आणि म्हणूनच या दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आपण कार्यक्रम साजरा करत असतो...  म्हणून मी विनंती करतो, की मंचावरील सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे..।।

★ प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ~

स्वागताचा सुवास, पसरावा आसमानात...!

स्वागत फुलांचा सुगंध, रहावा मान्यवरांच्या मनात...!!

 अतिथिंच्या आगमनाने..., 

हर्षित झाला सारा मेळा...! 

धन्य धन्य होऊनी करितो...,

हा स्वागताचा सोहळा... 

हा स्वागताचा सोहळा...!!

★ प्रस्ताविक ~

गुरूजनांचा आशीर्वाद घेवून... 

साथ दयावी सर्वांनी मिळून...! 

आजच्या आंदोलनाचा उद्देष... 

जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून...!!

    ज्ञानप्रकाशाचा महायज्ञ सतत प्रज्वलित ठेवत विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहित करणारे माझे शिक्षक बंधू-भगिनींनो... आज... शिक्षक दिन'

देशाचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे नेहमी त्यांच्या अनुयानांना सांगत की..

   जर समाजपरिवर्तन करण्याची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त एका सामान्य शिक्षकाकडे... आपण सर्व 'सामान्यातून' 'असामान्य' कार्य करत आहात... सात वर्षापासून 33 टक्केच्या बेड्यात अडकलेली विषय शिक्षक वेतनश्रेणी मुक्त करण्यासाठी जमलेल्या सर्व बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!!

● धरणे आंदोलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रवी आडे जिल्हा समन्वयक घाटंजी हे करतील.

★ मान्यवर मार्गदर्शन ~

वो मंजिलें भी सर झुका देंगी... 

जब दमदार तेरी तैयारी होगी...!! 

मुट्ठी में होगा तेरे मुकद्दर जब...

वेतोन्नती लेने की जीद तेरी भारी होगी...!!

  काळानुरूप शिक्षणामध्ये नवीन नवीन बदल शिक्षकाकडून स्वीकारली जावेत त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांना दिशा मिळावी या उदात्त हेतूने आपण केलेले मार्गदर्शन सर्व शिक्षकांना अविरत उत्कृष्ठ कार्य करण्याची प्रेरणा देत राहील... धन्यवाद साहेब... 

   आंदोलनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र उपस्थित सर्वांना तुमच्या मार्गदर्शनातून मिळाला... 

  लैहरो से डरकर नया पार नही होती...  मेहनत करने वाले की कभी हार नही होती...!! 

★ आभार प्रदर्शन ~

 थेंबाथेंबाने तलाव भरतो...

 हाताहाताने कार्यक्रम फुलतो... 

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार... 

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार..!!

  आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. राजहंस मेंढे सर जिल्हा समन्वयक हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...