बंजारा समाजाचे अराध्य दैवत... मानवतावादी कल्याणाची गुढी उंचच नेणा-या अशाच एका महान संताची आज 285 वी जयंती आहे. त्या संताचे नाव आहे संत सेवालाल महाराज. अशा या महान संतास जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
"बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…" 🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
बंजारा समाजाचे अराध्य दैवत...
मानवतावादी कल्याणाची गुढी उंचच नेणा-या अशाच एका महान संताची आज 285 वी जयंती आहे. त्या संताचे नाव आहे संत सेवालाल महाराज.
अशा या महान संतास जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
"बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…"
🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
संत सेवालाल महाराज जयंती भाषण -1
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.! क्रांतिकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज यांची जयंती....
संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची आवड हाेती. हे ओळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. या समाजाने बंजारा समाजाचा इतिहास व सेवाभावी शिकवण आपल्या कंठात सुरक्षित ठेवली आहे.
शिका छ । शिकवा छ ।। शिकण राज घडावा छ ।।
अशी शिकवण संत सेवाभायांनी दिली. आंध्र प्रदेशातून ते महाराष्ट्रात आले. त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण केले. दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली एक माेठी पंचायत भरविण्यात आली हाेती. या पंचायतीत बंजारा समाजासह इतर समाज माेठ्या संख्येने उपस्थित हाेता. बंजारा समाज त्या काळी अनेक धर्मात विभागला हाेता. ते त्यांनी राेखले. संत सेवाभायांनी आयुष्यभर तुळजाभवानी मातेची पूजा केली. याचबराेबर हिंदू धर्माची शिकवण दिली. त्यांनी पाैष शुक्ल पक्ष मंगळवार, दि. २ जानेवारी १८०६ राेजी रुईगड, ता. दिग्रस, जि. यवतमाळ येथे समाधी घेतली. अशा या महान विचारवादी संताचे कार्य जगासमाेर लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. गाेर बाेली फक्त भाषा असल्याने त्यांची नाेंद नाही. आजमितीस भारतातील कराेडाे लाेक त्यांची पूजा करतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काेटी काेटी विनम्र अभिवादन!
जय बंजारा..!! जय सेवालाल...!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
संत सेवालाल महाराज जयंती भाषण -2
बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरु युगपुरष संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख अतिथी, माझे आदरणीय सर्व गुरुजन व मित्र-मैत्रिणींनो...
संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते. हे अहिंसेचे विचारक होते. समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी पाच हजार बकऱ्यांची कत्तल केली जाते. ही प्रथा बंद व्हावी, मी ही देवाचा भक्त आहे, देवाला प्रसन्न करण्यासाठी या बळी देण्याच्या विचारापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी समाजा समोर केले. जी व्यक्ती इतरांच्या कल्याणाचा विचार करते, ती व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. संत सेवालाल महाराज बंजारा समाजातील तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांच्याच बोली भाषेत उपदेश करायचे.
ज्याने गरिबांवर अन्याय केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला माणूस म्हणून जगण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यानंतर सेवालाल महाराज आपल्या बंजारा भाषेत बोलत असत.
जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्रियांचा आदर करा,आणि मुली जिवंत देवी आहेत, भेदभाव करू नका, खोटं बोलू नका, व्यसन करू नका, गरजूंना अन्न द्या. सन्मानाने आयुष्य जगा., काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा, माणुसकीवर प्रेम करा.,
अशी शिकवण संत सेवालाल महाराजांनी सर्व समाज बांधवांना दिली.
जय बंजारा..!! जय सेवालाल...!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
संत सेवालाल महाराज जयंती भाषण -3
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन उपस्थित सर्व समाज बांधव आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.! क्रांतिकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज यांची जयंती या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. मी तुम्हाला दोन शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे.
बंजारा समाजातील समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांचे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गोलाल डोडी हे त्याचे गाव होते. आता त्या गावाला सेवागड नावाने ओळखतात. सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. बंजारा समाज त्यांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. बंजारा समाज हा सर्व व्यापारी भारतातील बड्या राजांना आणि सम्राटांना अन्नधान्य पुरवत असत. पण सर्वसामान्यांची चिंता ही गौर बंजारा समाजातील संत सेवालाल महाराजांची होती. त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी व त्यांच्या कल्याणकारी विचारांची स्थापना केली.
समाजाला दिशा देण्याचे कार्य केले: सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड या गावी त्यांची समाधी आहे. आध्यात्मिक व समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे. बंजारा समाजातील शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आज देखील लोकसाहित्यामधून दिसून येते.
जय बंजारा..!! जय सेवालाल...!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
संत सेवालाल महाराज जयंती भाषण -4
क्रांतिकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज जयंती... कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन उपस्थित सर्व समाज बांधव आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.!
भेदभाव करू नका, सन्मानाने आयुष्य जगा, इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका, स्त्रियांचा सन्मान करा, काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा, पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणी द्या आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे पाप आहे, वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा, मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा, माणुसकीवर प्रेम करा, आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा, कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका, धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.
जयंती शासन स्तरावर साजरी: संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण, गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र तसेच तेलंगानात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध लढा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
जय बंजारा..!! जय सेवालाल...!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
संत सेवालाल महाराज जयंती भाषण -5
ज्यांच्या अथक समाज प्रबोधनातून आज बंजारा समाज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या वाटेने वाटचाल करत आहे असे क्रांतिकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज यांची जयंती...
कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, परम पूज्य गुरुजन, आजच्या पावन कार्यक्रमास उपस्थित सर्व समाज बांधव आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.!
संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलार दोडी तांडा ता.गुंटी, जिल्हा अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील एका गावात पशुपालक कुटुंबात भीमा नायक रामावत व आई धर्मानी यांचाकडे झाला. संत सेवालाल हे लहानपणा पासून विरक्त स्वभावाचे होते. संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. त्यांनी मानव कल्याणासाठी गोरक्षा करण्याचा, मानवतेचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ते धर्माचे रक्षण करण्यासाठी निजामाशी लढले. तसेच अनिष्ट रूढी आणि शोषणाविरुद्ध वाणीतून सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रहार केला. त्यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शासन स्तरावर साजरी केली जाते.
संत सेवालाल महाराज यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. संत सेवालाल यांनी दिलेल्या सेवाभावाची शिकवण बंजारा समाजाने आपल्या कंठात गीतांच्या रूपाने जपून ठेवली.
जय बंजारा..!! जय सेवालाल...!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
No comments:
Post a Comment