श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती..
27 फेब्रुवारी "मराठी भाषा गौरव दिन"
मराठी भाषा गौरव दिन भाषण - 1
सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार.! जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या, मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा..
हिच्या संगान जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा...!!
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासनाच्या निर्णया नुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले.
जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
मराठी भाषा गौरव दिन भाषण - 2
आज मराठी भाषा गौरव दिन तेव्हा जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या, मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना आज 27 फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस.
कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 27 फेब्रुवारी 1922 या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला. त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली.
मराठी भाषा ही अमृतालाही पैजेणे जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृता पेक्षा अधिक आहे. मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे मराठी भाषा ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे. देववाणी संस्कृत भाषा ही मराठी भाषेची महामाय म्हणून ओळखली जाते.
मराठी भाषा भारतामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
मराठी भाषा गौरव दिन भाषण - 3
सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो...
माय मराठी, साद मराठी..
भाषांचा भावार्थ मराठी..
बात मराठी सात मराठी..
जगण्याला या अर्थ मराठी...!
महाराष्ट्रात दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज ( विष्णू वामन शिरवाडकर) यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. या कार्याची आठवण म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला 27 फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.
अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इत्यादीं यांचे कुसुमाग्रजांनी कुशल असे लेखन केले. नटसम्राट सारखे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते तर कुसुमाग्रजांचे विशाखा हे काव्यसंग्रह भारतातील साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमची भूषण ठरले आहे.
आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिला आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे.
यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले पाहिजे मराठी लेखन वाचन केले पाहिजे तसेच मराठीतील ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजे.
जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. मराठी भाषा जतन करण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांची सुरुवात मराठी भाषा दिन या दिवशी करण्याची पद्धत आहे.
जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
मराठी भाषा गौरव दिन भाषण - 5
सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो...
माझा शब्द, माझे विचार,
माझा श्वास, माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी,
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
मराठी भाषेला ज्ञानपीठ मिळवून देणारे महान साहित्यिक कुसुमाग्रज यांना मानवतेचे कवी म्हटले आहे. या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी भर घातली त्याचप्रमाणे त्यांच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान व मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 पासून शासन निर्णयानुसार 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला. मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे. मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा आहे. मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे.
दैनंदिन जीवनात तसेच आजच्या इंटरनेट युगात समाज माध्यमावर मोठ्याप्रमाणावर मराठीचा भाषेचा उपयोग करूया. मराठी भाषेच्या जास्तीत जास्त उपयोग करून संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून, मराठी भाषेला अजरामर बनवूया. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो.
जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!
No comments:
Post a Comment