"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सत्कार कार्यक्रम सूत्रसंचालन

स्वागतम...स्वागतम..सुस्वागतम..!!

  शांळामध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये,  विविध सत्काराचे कार्यक्रम पार पडत असतात जसे गुणगौरव सोहळा, यश संपादन, पदोन्नती, खेळांडुचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार, सेवानिवृत्ती कार्यक्रम तर अश्या कार्यक्रमाचे सत्कार समारंभ सूत्रसंचालन कसे करावे.. हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत, शिवाय कार्यक्रमाची शोभा वाढवणार्‍या काही सुंदर अशा सत्कार समारंभ चारोळ्या/शायरी सुद्धा पाहणार आहोत.

सत्कार समारोह सूत्रसंचालन एक उत्कृष्ट नमुना पुढील प्रमाणे...

स्वागतम...स्वागतम..सुस्वागतम..!!

एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही...!!

गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही...!!
   राजाधिराज गणराजाला वंदन करून मी सतीश बोरखडे सचिव मास्टर अथलेटिक्स स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशन दारव्हा आजच्या या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करतो.

  नमस्कार मंडळी...!!  आज आपण या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाने नगर परिषदेच्या माध्यमातून दारव्हा नगरीचा कायापालट करणे, दारव्हा शहराचा सर्वोत्तम विकास करणे असे ज्यांचे स्वप्न आहे. दारव्हा शहर सर्वांग सुंदर करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जे व्यक्ती मागील दीड वर्षापासून कार्य करत आहेत त्या कर्तुत्वान मान्यवर व्यक्तींचा सत्कार  विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ पार पडणार आहे. सर्व माननीय सज्जनांच्या सहवासात संपन्न होत असलेल्या सोहळ्यासाठी सर्वांचं सस्नेह स्वागत ! 

★ पाहूणे स्थानापन्न करणे -
"हिऱ्याशिवाय कुंदणाला शोभा नाही...
गोडीशिवाय ऊसाला शोभा नाही...!!
सुगधांशिवाय फुलाला शोभा नाही...
तसेच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमालाही शोभा नाही...!!
      म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मास्टर्स ऍथलेटिक्‍स स्पोर्ट ऍण्ड वेल्फेअर असोसिएशन दारव्हा अध्यक्ष मा. राजेन्द्र चिंतकुटलावार सेवानिवृत्त तहसीलदार  यांनी स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर प्रमुख अतिथी यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करावे...
1)
2)
3)

★ प्रतिमा पूजन /दीप प्रज्वलन ~
ज्योत तेवते समतेची... ज्योत तेवते त्यागाची... ज्योत तेवते क्रांतीची अन् समर्पणाची... या ज्योतीने एकच संदेश दिला आहे.... स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं.... आणि म्हणूनच या दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आपण कार्यक्रम साजरा करत असतो...  म्हणून मी विनंती करतो, की मंचावरील सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे..।।

★ प्रमुख अतिथींचे स्वागत ~
अतिथिंच्या आगमनाने... हर्षित झाला सारा मेळा...!!
धन्य धन्य होऊनी करितो... हा स्वागताचा सोहळा... हा स्वागताचा सोहळा...!!
अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे स्वागत उपस्थित सत्कार करते व्यक्तींची नावे आपल्याकडे नोंद असायला पाहिजे.
   आजच्या विशेष सत्कार कार्यक्रमासाठी दारव्हा नगरी येथील माजी नगरसेवक, राजकीय पक्षाचे तालुका पदाधिकारी, तसेच आपल्या कार्याने  आपल्या क्षेत्रात कार्याची छाप सोडणारे सर्व मान्यवरांचे मी शब्द सुमनानी स्वागत करतो.
★ प्रस्ताविक ~
गुरूजनांचा आशीर्वाद घेवून...
साथ दयावी सर्वांनी मिळून...!
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष...
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून...!!
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमचे मित्र मा. श्री. -------- प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो
★ सत्कार मूर्तीचा सत्कार~
व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे,... व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे, केलेल्या प्रत्येक कार्याला  प्रामाणिकतेचा विचार आहे... आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे.
असे आजचे मुख्य सत्कार मूर्ती...

1) मा. श्री. विठ्ठल दत्तराव केदारे
मुख्याधिकारी न.प. दारव्हा
 “प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते.” असे 
संपूर्ण दारव्हा शहराच्या सौंदर्यकरणाचा वसा घेणारे कर्तुत्ववान व कार्य कुशल अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरीचा सत्कार....
 शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन....

2) मा.श्री. मनीष उल्हास राठोड
अभियंता न.प. दारव्हा
    दारव्हा नगरी मध्ये सुरू असलेल्या कामाला न्याय देणारे चांगले कामासाठी वेळेचे तमा न बाळगणारे सर्व परिचित व्यक्तिमत्त्वाचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन...

★ प्रमुख पाहुणे मार्गदर्शन ~
◆या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मा.....यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.व आम्हांस उपकृत करावे.मा.....

◆यानंतर  मी विनंती करते की ज्यांनी  आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरून पिढीसमोर आदर्श ठेवला आहे असे मा....... यांनी आपल्या भावना/दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करुन आम्हांस मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.मा.श्री....

★ सत्काराला उत्तर-
   हृदयातील आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार सत्कार.... काळजाच्या मायेचा संचित म्हणजे सत्कार... कर्तुत्वान सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार... आजच्या कार्यक्रमाचे कर्तृत्ववान नेतृत्व नगरपरिषद दारव्हा मुख्याधिकारी मा. श्री. विठ्ठल  केदारे सत्कार्याला उत्तर देण्यासाठी पुढे यावे.

★अध्यक्ष मनोगत ~

"गुलाब उमलतो नाजूक कळ्यांवर
गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखांच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर...."
आणि, कार्यक्रम फुलतो अध्यक्षांच्या मार्गदर्शनावर... म्हणूनच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा........ साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करावे असे मी विनंती करतो.

★ आभार प्रदर्शन ~
थेंबाथेंबाने तलाव भरतो... हाताहाताने कार्यक्रम फुलतो... जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार... तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार..!!
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन.... करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
~~~~~~~~

■ कार्यक्रम प्रसंग /अनुरूप व उपयुक्त पडतील अशा चारोळ्या शायरी...

हृदयातील आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार सत्कार
काळजाच्या मायेचा संचित म्हणजे सत्कार
कर्तुत्वान सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार

★ तुमच्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न आकारले,
तुमच्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे सुखी जीवन साकारले.

★ “परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा.”

★ आपल्या या आगमनाने हर्ष मनी तो दाटला,
प्रांगणी हा गोतावळा बघा सत्कारास तो जमला.” 

★ “प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते.”

★ व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे,... व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे, केलेल्या प्रत्येक कार्याला  प्रामाणिकतेचा विचार आहे... आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे.

★ सोन्या-चांदीच्या कोंदनात चमकतात हिरे...
मान्यवर म्हणून शोभतात आपणच सत्कार मूर्ती खरे...!!

 पग पग सुनहरे फूल खिले ,
कभी ना हो काटोंका सामना
जिन्दगी आपकी खुशीसे भरी रहे ,
यही है हमारी मनोकामना ।



No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...