गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे गुरुवे नमः
गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही...!!
मनी नवी उमंग आहे... प्रसन्न अंतरंग आहे...! गोड हा प्रसंग आहे ... नि आपुलकीच्या मित्रांचा सुसंग आहे !!
सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आदरणीय सर्व उपस्थित मित्र मैत्रिणींनो १९९५ ते ९७ च्या बॅचमधील मॉन्टेसरी डीएड कॉलेजचे सर्व विद्यार्थी गेट-टुगेदर च्या निमित्ताने सर्वजण सुवर्ण क्षणाचे साक्षीदार या "जिव्हाळा मैत्रीचा सोहळा" कार्यक्रमास उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे हृदयपूर्वक अभिनंदन स्वागत करतो...
आपल्या वर्गमित्रांमधील काही मित्रांनी स्वतःला सिद्ध करत शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच जिल्हा पतसंस्थेचे संचालक व विविध बाबींमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखविले, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचणारे आपलेच मित्र आहेत...!! आपला प्रत्येक वर्गमित्र आपल्या कर्तव्यामध्ये कार्य कुशल यशस्वी झाला आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो...
★अध्यक्ष स्थानापन्न करणे-
“प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते.” असे सन्माननीय श्री. xxxx यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो.
ज्यांची उपस्थिती वाढविते
आपल्या कार्यक्रमाची शान
स्वीकारूनी आमची विनंती
आपण भूषवावे अध्यक्षस्थान
स्वीकारावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान..
★ प्रमुख अतिथी -
शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक यांना सन्मानपूर्वक स्थानापन्न करणे...
सोबत आपल्या यशस्वी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एखाद्या मित्राला प्रमुख अतिथी मध्ये स्थान द्यावे.
★ अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत/ सत्कार-
अतिथी देवो भव
★ प्रस्ताविक :-
गेट-टुगेदर म्हणजे पुन्हा कॉलेज कट्टा..! गेट-टुगेदर म्हणजे आनंदाचा सट्टा..!!
हेच ती डीएड कॉलेज होते जिथे जगायचे कसे.. वागायचे कसे.. बोलायचे कसे... परक्याला पण आपले करायचे कसे.. एकंदर चांगले जीवन जगायचे कसे..!! ह्या सर्व गोष्टी याच मित्रमंडळीच्या सहवासात या गोष्टी आपण शिकलो ना...!!
जीवनाच्या कुठल्यातरी एका ठराविक टंपप्प्यापर्यंत सोबत असणारी ही मित्र-मैत्रिणींचे मैफिल कधीतरी परत येईल का? जेव्हा ही पाखरे उडून जातात आणि बऱ्याच मोठ्या काळा नंतर मुक्त विहार करून परत एकदा एकत्र येतात.. अशा या माझ्या मित्र-मैत्रिणींचे दूर गेलेले हे चेहरे पाहण्यासाठी "जिव्हाळा मैत्रीचा सोहळा" या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ येथील आपल्या जिवलग मित्रांनी केले.. सर्वांचे हृदयातून अभिनंदन करतो..!!
कॉलेजच्या मैत्रीच्या गमतीचे ते दिवस गेले तरीही त्या आठवणी ते नेहमीचे वेगवेगळे कार्यक्रम, ते सरावपाठ, तो सेवकाल, गावात जाऊन केलेले गटंकार्य कितीही विसरतो म्हटलं तरी मनाच्या पटलावरून त्या आठवणी पुसल्या जात नाहीत...!!
हर्ष मनात मावेंना मिळेल स्मृतींना उजाळा.. असा आजचा आगळावेगळा आहे जिव्हाळा मैत्रीचा सोहळा..!!
सुंदर व स्वच्छंद असे हे नाते म्हणजेच मैत्री... माझे सर्व जिवलग मित्र आणि मैत्रिणी ज्यांच्या सहवासाशिवाय जीवनाच्या खऱ्या आनंदाची कल्पनाच करणे अशक्य आहे मैत्री या दोन अक्षरी शब्दात किती मोठे विश्व आहे.
★मनोगत/ प्रतिक्रिया/ आठवणींना उजाळा -
1) कॉलेजच्या त्या दिवसात केलेल्या गमती जमती, एकत्र बसून खाल्लेले डबे, दोन वर्ष एकमेकांचे सहकार्य घेत केलेले ते सर्व उपक्रम मन पिळवटून काढणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरल्या त्या गोड आठवणी...!! चला तर मग आता पुन्हा एकदा या गोड आठवणींना उजाळा देऊया आणि जिव्हाळा मैत्रीचा सोहळा साजरा करूया...!!
पावसात जेवढा ओलावा नसेल तेवढा जिव्हाळा मैत्रीत असतो, मैत्रीतल्या सावलीचा अर्थ प्रत्येकाला उन्हात गेल्यावर कळतो.. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम जिव्हाळा मैत्रीचा सोहळा..!!
2) काही कारणामुळे न उपस्थित झालेला मित्रांसाठी मी एवढेच म्हणेल....
तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही..
अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही...!
गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे...
जेव्हा तुलाच वेडया हसण्यास वेळ नाही...!!
आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे..
आता जगाकडे ही बघण्यास वेळ नाही..!!
3)जरा बसाव या वळणावर... खरंच कॉलेजचा तो काळ सुखाचा होता ना... आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निघून गेल्यावर प्रकर्षाने होते..
सुखाचे ते क्षण कॉलेजच्या काही आठवणी प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही दाटलेल्या आहेत.. हे मला आज उपस्थित मित्रांचे चेहरे वाचताना प्रकर्षाने जाणवलं...!!
4)
★ गीत गायन :-
कॉलेजच्या त्या जुन्या आठवणीत भावविभोर वातावरण प्रपुलित/आनंदित करण्यासाठी विद्या ढोके मॅडम जरा विसूया वळणावर गीत गायन करतील..
★श्रद्धांजली :-
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्या मित्र परिवाराला सोडून गेलेले राधेश्याम बोके... आणि रीता उमरखेडे... यांना श्रद्धांजली अर्पण करूया...!!
★ प्रमुख अतिथी मनोगत-
1) या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मा.....यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.व आम्हांस उपकृत करावे.मा.xxx
2) चालते बोलते पुस्तकांचे ग्रंथालय. त्या जबरदस्त व्यक्तिमत्वाला आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या जयघोषात आमंत्रित करतो, मा. श्री. xxx
3) बोलके करण्यास हवे असते संभाषण...
आधारासाठी हवे असते आश्वासन... योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन...!!
आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो मा. श्री. xxx
4) कस्तुरी मृग दूरवर असतो, पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दरवळून टाकलेले असते. तशीच काही माणसं असतात, जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघं जग सुगंधी करतात..! असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या भावना व्यक्त कराव्यात मा.xxx
★ अध्यक्ष भाषण-
यानंतर मी विनंती करते की ज्यांनी आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरून पिढीसमोर आदर्श ठेवला आहे असे "स्नेहमिलन जिव्हाळा मैत्रीचा सोहळा" कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.... यांनी आपल्या भावना/दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करुन आम्हांस मार्गदर्शनाचा लाभ द्यावा. मा.श्री...
★ आभार प्रदर्शन-
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार...
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार...!!
सूत्रसंचालन ‘प्रोटोकॉल’ महत्त्वाचा असतो. परंतु हा कार्यक्रम आपुलकीच्या मित्राचा असल्यामुळे परिस्थितीनुसार आपण थोडा बदल करू शकतो जास्त औपचारिकता नसावी..
★उपलब्ध वेळेनुसार हे प्रभावशाली विचार तुम्ही मांडू शकता...
जीवनात" हार कधीच मानु नका, कारण "पर्वतामधुन" निघणा-या नदीने "आजपर्यंत" रस्त्यात कोणालाच "विचारले" नाही की "समुद्र" किती दुर आहे...
जाग यावी सृष्टीला... होऊ दे माणूस जागा...
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी...
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी...
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा...!!
विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे सौंदर्य सुस्वभाव यांची बेरीज करा मैत्रीतून मत्सर वजा करा प्रेमाला शुध्द अंतकरणाने गुणा... परमनिंदेचा लघुत्तम काढा... सुविचारांचा वर्ग करा... दया क्षमा यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आ युष्या चे गणित आहे...
झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालविणे होत नाही प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते ईश्वराचा गुरूंचा आणि वडील धारा-यांचे आशिर्वाद त्याच पैकी एक आहे..
पेन्सिल हातात धरतानाही लटपटणारे हात जेंव्हा हुबेहूब शिक्षकांच्या अक्षरांची नक्कल करतात..ते असतं आमचं प्रशस्तीपत्र.. दिवसातून वीस पंचवीस वेळा शिकवलेली अक्षरं दुसऱ्या दिवशी पुन्हा चुकीची उच्चारणारा विद्यार्थी जेंव्हा खडाखडा वाचु लागतो..ते असतं आमचं बक्षीस... आदल्या दिवशी ज्याच्यावर प्रचंड रागावून गेलो तोच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी सकाळी छानस हसुन Good Morning म्हणतो ना तोच असतो आमचा पुरस्कार...
लोक म्हणतात माणसांन सोन असावं...
पण मी म्हणतो माणसान सोन नसावं...
कारण सोन फक्त हातात राहते.. सोन फक्त गळ्यात राहते... सोन फक्त तिजोरीत राहते...!!
म्हणून माणसाण सोन नाही तर परिस व्हावं... ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं...
असे परिस समान असणारे माझे सर्व मित्र मैत्रिणींचा "स्नेहमिलन जिव्हाळा मैत्रीचा सोहळा" जिवलग मित्रांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या सोहळ्यासाठी सर्वांचं सस्नेह स्वागत !
No comments:
Post a Comment