स्वागतम स्वागतम सुस्वागतम....!!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून मी सतीश बोरखडे सचिव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ दारव्हा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो...
आज उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर, आदर्श भारत घडविण्याचे स्वप्न उराशी बांधून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू-भगिनींनो...
सज्ज सारे लोक आहेत क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमीचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिकहो शब्द माझे स्वागताचे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिलेदार या सत्रात सेवा निवृत्त झाले. संघटनेतील त्यांच्या योगदानासाठी "सेवा सत्कार" आजचा हा कार्यक्रम.... तरी उपस्थति पाहुण्यांच व मान्यवरांच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो.
★कार्यक्रमाचे अध्यक्ष ★
मा.श्री. मधुकर काठोळे, राज्य शिक्षक नेते
राज्य अध्यक्ष सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र
★प्रमुख अतिथी ★
1)मा.श्री. राजेश उदार जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
2)मा.श्री. विठ्ठलदास आरू जिल्हा सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
3)मा.श्री.संजय बिहाडे, सचिव
जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी पतसंस्था 109
४)मा.श्री. भगवंतराव राऊत
अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संघटना
★★सत्कारमूर्ती -
1) मा. मारुती उघडे, सेवानिवृत्त मु.अ.
2) मा. मुरलीधर खवले, सेवानिवृत्त मु.अ.
3) मा. यशवंतराव पवार, सेवानिवृत्त मु.अ.
4) मा. प्रकाश राऊत, सेवानिवृत्त मु.अ.
5) मा. बफत खान सेवानिवृत्त शिक्षक
काळ्याकुट्ट भूतकाळाच्या छाताडावर वार करुन हिंदुस्थानचे उज्वल भविष्य घडवत सोन्याच स्वराज्य उभे करणारे न भुतो न भविष्यती असे राजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी
प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे...
अशी मी त्यांना विनंती करतो.
★दीप प्रज्वलन★
“जीवनाला हवी प्रकाशाची साथ, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आहे आपणास ज्ञान.”
उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो कि त्यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी.
★पाहुण्यांचे स्वागत★
अतिथिंच्या आगमनाने...
हर्षित झाला सारा मेळा...!!
धन्य धन्य होऊनी आम्ही करितो...
हा स्वागताचा सोहळा...
हा पाहुण्यांच्या स्वागताचा सोहळा...!!
★ प्रस्ताविक -
गुरूजनांचा आशीर्वाद घेवून...
साथ दयावी सर्वांनी मिळून...!
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष...
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून...!!
★मान्यवरांचे मनोगत -
1)
2)
3)
4)
•कार्यक्रमाचा प्रोटोकॉल थोडा बाजूला सारून ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या कल्पनेतून हा सुंदर कार्यक्रम आयोजित झाला त्यांचा सत्कार करणे क्रम प्राप्त आहे..
★ सत्कार मूर्तींचे विचार -
“निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी, डोळ्यात साठते पाणी मुक होते वाणी.”
आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री………………… आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
★अध्यक्षीय भाषण -
ज्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले.. हजारो लोकांचे अस्तित्व/भविष्य बदलण्याची ताकद ज्यांच्या शब्दात आहे. अशी कर्तुत्ववान व्यक्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो...
★ आभार प्रदर्शन ~
आभाराचे भार कशाला,
फुलांचे हे हर कशाला,
हृदयातच घर बांधूया,
या घराला दार कशाला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. विलास सरागे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
No comments:
Post a Comment