किटकनाशके वापरतांना/ फवारताना आपल्या ला धोका होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी….
आतापर्यंत कीटकनाशक फवारताना जीवित हानी झाल्याच्या विविध घटना आपण ऐकत आहोत काही दक्षता घेतल्यास आपण सुरक्षित राहू शकतो.
1) नादुरुस्त फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर करावा.
3) तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये.
4) किटकनाशक वापरतांना संरक्षन कपडे वापरावे.
5) फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छा धुवून ठेवावे.
6) झिजलेले, खराव झालेले नोझल्स बदलुन घ्यावेत.
7) किटकनाशकाला हूंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
8) फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.
9) किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्यामुळे फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
10) फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतरच हात साबनाने स्वच्छ धुवून खाणे पिणे करावे.
11) फवारणीच्या वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासुन दुर ठेवावे.
12) उपाशी पोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहरी करावी.
13) फवारणी करतांना वापरलेली भांडी इ. साहित्य नदी ओढे किंवा विहिरीजवळ धूवू नयेत. तर धूतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावे अथवा मातीत गाडावे.
14) किटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुण टाका.
15) फवारणी करतांना जोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फेकु नये अथवा हवा तोंडाने आत ओडु नये त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टचणी वापरावी.
16) किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये. हे काम करणाऱ्या प्रत्येक व्याक्तिाने ठराविक कालावधिन डॉक्टरांकडुन स्वतःला तपासुन घ्यावे.
17) किटकनाशके फवारण्याचे काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावे, व वेळोवेळो स्वच्छ धुवून काढावेत.
18) किटकनाशके अंगावर पडु नये म्हणुन वाऱ्याच्या विरुध्द फवारणी करु नये.
19) किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरन्यास कमीत कमी दोन आठवडे जावू देवू नये.
20) जमिनिवर सांडलेले किटकनाशक हातानी न पुसता व त्यावर पानी न टाकता ती माती/चिखल यांच्या सहाय्याने शोषुन घ्यावेत व जमिनित गाड्डुन टाकावीत.
21) डब्यावरील मार्गदर्शन चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावेत.
लाला रंगाचे चिन्ह। खून असलेली औषधी सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो…
No comments:
Post a Comment