स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन

 

स्वागतम स्वागतम सुस्वागतम

उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडविला

ज्यांनी लिहिली आजादीची गाथा...!

त्यांच्या चरणी ठेवीतो माथा...!!

 •मी सतीश बोरखडे सर्वप्रथम सर्वांना  या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करतो.

    इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केलं व इंग्रजांना भारतातून हाकलून देऊन भारत स्वतंत्र करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्षवेधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे त्या तपस्येची गाथा आहे

देशासाठी लढणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून आज सर्व भारतभर हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या सर्वांसाठी एवढेच मला वाटेल...

अहो झुकर सलाम करे उनको

जिनके हिस्से मे ये मुकाम आता है...!

खुश नसीब होता है वो खून

जो देश के काम आता है...!!

★स्थानापन्न करणे ~

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपणास सर्वांना सुपरिचित असलेले माननीय........    यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो

आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री यांनी यांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान स्वीकारावे अशी मी विनंती करतो...

★ध्वज पूजन प्रतिमापूजन दीप प्रज्वलन-

उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे...

सुमंगल या वातावरणात

संचारुणी आली देशभक्ती

मान्यवरांच्या शुभहस्ते

प्रजल वित्त कराव्या ज्योती

★ ध्वजारोहण ~

    आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय

यांनी ध्वज स्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो

ध्वजा रोहन नंतर विद्यार्थी राष्ट्रगीत व नारे

भारत माता की जय

    •विजयी विश्व तिरंगा प्यारा समुगान घेण्यात यावे नंतर महाराष्ट्र गीत...

★पाहुण्यांचे स्वागत~

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

   मंचावरील प्रमुख अतिथी यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

 •इतर मान्यवर यांचे स्वागत घेण्यात यावे.

★ स्वागत गीत

भावना हृदयात तयार होतात

शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात

त्यातूनच साकारल्या जातात खऱ्या भावना

स्वागत गीत घेऊन येत आहे आमच्या शाळेतील गीत मंचाचे विद्यार्थी आणि संच

★प्रस्ताविक

     मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन

साथ द्यावी सर्वांनी मिळून

आजच्या कार्यक्रमाचा उद्देश

जाणून घ्यावा प्रास्तविकेतून

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील मुख्याध्यापक श्री...... हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. 

      भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्या साठी असंख्य हुतात्म्यांची आहुती दिल्या गेली असंख्य क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा सूर्योदय दिसू शकला आहे.

    दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या जुलमी राजवटी मधून भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला तेव्हापासून हा दिवस आसे तू हिमाचल संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जातो आजच्या दिवशी सर्व स्वातंत्र्य सैनिकाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. स्वातंत्र्यसैनिकाप्रतिक कृतज्ञता व्यक्त करून देशासाठी त्यांचे विचार आज जोपासणे आवश्यक आहे..

मला देशाने सर्व काही द्यावे ही अपेक्षा न करता मी देशासाठी काय देऊ शकतो याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे देशी त्याचे विचार ठेवून देशभक्ती राष्ट्रगीत प्रत्येक भारतीयाने हृदय जोपासण्याची आज आवश्यकता आहे

एवढे बोलून माझ्या प्रास्तविकास पूर्णविराम देतो धन्यवाद,.

★विद्यार्थी व शिक्षक भाषणे -

★अध्यक्ष भाषण - 

ज्ञानरूपी मार्गाच्या

 पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा..

 त्यासाठी मान आहे

 अध्यक्षीय मार्गदर्शनाचा...!!

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. -------  हे आमच्या शाळेतील विद्यार्थी व उपस्थित त्यांना देशभक्तीचे प्रेरणा मिळेल यासाठी आपले मौलिक विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो.

★आभार~ 

कार्यक्रम झाला बहारदार

भाषणेही झाली जोरदार

व त्यांनी उचलला श्रावणाचा बार

तेव्हा मानले हेच पाहिजे सर्वांचे आभार..!!

  आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार माननीय देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते...

थेंबा थेंबाने तलाव भरतो

हाता हाताने कार्यक्रम फुलतो

जेथे तेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

     उपस्थित सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी जिल्हा परिष

द उच्च प्राथमिक मराठी शाळा --------- तर्फे आपणा सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार मानतो.


2 comments:

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...