अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों….
जय शिवाजी.. जय महाराष्ट्र..!!
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत. मुघलांविरुद्ध भारताची शान राखणारे ते एक अत्यंत निर्भय, ज्ञानी, शूर राजे होते.
शेतक-यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले.
सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच शिवरायांची शिकवण होती.
छत्रपती शिवरायांची जयंती दरवर्षी देशभरात विशेषत: महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे Pdf साठी क्लिक करा..
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -3
माझे आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मराठा साम्राज्याचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक नाहक मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक पेटता अंगार.. ! अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊची पुण्याई फळाला आली कारण जनतेचा पोशिंदा, राजा शिवबा जन्मला आले.
माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांच्या कैवारी जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले..
शिवराय जिजामातेच्या संस्करा खाली हळू हळू वाढू लागले..
महाराष्ट्रातील लोकप्रिय संत रामदास आणि तुकाराम यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे व्यक्तिमत्व इतके मनमोहक होते की त्यांना भेटणारा प्रत्येकजण त्याच्यावर प्रभावित होत असे.
जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. वेळ आली होती पण हिंमत सोडली नाही. म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार हि सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती.
म्हणून एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा.!! मानाचा मुजरा.!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -4
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिकहो, सर्वांना माझा नमस्कार.
एकेकाळी आम्ही जनावरासारखे जीवन जगत होतो. आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता, जनावर आणि माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते..
जिजाऊंनी शिवबाला लहानपणा पासून सत्यासाठी, न्यायासाठी लढायला शिकवले. शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या.
जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या-भाबड्या जनतेला गुलामी गिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायां समोर ठेवला.
शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची किर्ती.! राजा शोभून दिसे जगती..! असा तो शिवछत्रपती.. राजे असंख्य झाले आजवर या जगती..! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती..!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -5
आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.
शिवाजी महाराज युद्धात निपुण होते. विजापूर संस्थानातील काही छोटे किल्ले आणि काही प्रदेश जिंकून त्यांनी आपल्या विजयाची सुरुवात केली. त्याच्या वाढत्या प्रभावामुळे विजापूरचा राजा घाबरला. त्याने शिवाजींना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. शेवटी त्याने मुत्सद्दी खेळी करून आपला सेनापती अफझलखान याला शिवाजींकडे वैयक्तिक भेटीसाठी पाठवले. कपटाने शिवाजींना संपवणे हा त्यांचा उद्देश होता, पण शिवाजींना त्यांची युक्ती समजली. त्यांनी अफझलखानचा वध केला. यानंतर विजापूरच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले, त्यामुळे विजापूरच्या राजाला त्यांच्याशी शांतता करार करावा लागला.
त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे तत्कालीन मुघल शासक औरंगजेब घाबरला. त्याने आपले सेनाध्यक्ष आणि अनेक सेनापती शिवाजीला कैद करण्यासाठी पाठवले पण त्या सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले. ते शिवाजींच्या गनिमी तंत्रासमोर टिकू शकले नाहीत, शेवटी औरंगजेबाने त्यांना कपटाने कैद केले पण ते त्यांना जास्त काळ कैदेत ठेवू शकला नाही. आपल्या हुशारीने ते बंदिवासातून बाहेर पडले.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.
सहयाद्रीच्या रांगावरती….
सदा मुघलांच्या नजरा !
बोट छाटली तयांची….
त्या शिवबांना माझा मुजरा !!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -6
महाराष्ट्राचे आराध्य दैवत परम प्रतापी जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ च्या लेकीचा मानाचा मुजरा
शिवजयंती ह्या दिवशी मनापासून आदर, आणि गर्व हृदयात वाटतो. ह्या भूमीतलं परम प्रतापी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, यांनी आपलं विश्वास, साहस महाराष्ट्राचं सार्थ प्रेरणा देत राहील.
ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक, त्यांचं साहस, शिवाजी महाराज, तुमचं नाम ह्यांनी सर्व भारतीयांचं हृदय गुंतलं. तुमचं असलेलं धैर्य, साहस, आणि आत्मविश्वास ह्या भूमीतलं हरित आहे. ह्या भूमीतलं तुमचं योगदान, ह्या भूमीतलं तुमचं स्मृतिचंदन, आपलं छत्रपती, आपलं नेतृत्व ह्या भूमीतलं चिरंजीव रहेन.
आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टींचे चिंतन करावे. केवळ दाढीमिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर हवा.
मावळ्यांनो आज गरज आहे हे समजून घेण्याची कि मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे.
जय भवानी, जय शिवाजी!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे Pdf साठी क्लिक करा..
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -7
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. !
शिवरायांच्या चरित्र निर्माणात त्यांच्या आई जिजाबाई यांचे विशेष योगदान होते. त्या अत्यंत धार्मिक विचारांच्या होत्या, त्यामुळे शिवाजीमध्ये धार्मिक सहिष्णुतेची भावना निर्माण झाली. त्यांनी सर्व धर्मांचा समान आदर केला. त्यावेळी भारत मुघलांच्या ताब्यात होता. मुघल शासकांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि भेदभाव पाहून ते संतापले.
हिंदूंना त्यांच्या धर्मामुळे एक विशेष कर भरावा लागत होता ज्याला जिझिया कर असे म्हणतात. आपल्याच भूमीवर आपल्याच लोकांवर होणारा अन्याय पाहून तो सहन करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे त्यांनी मुघलांचा पाडाव करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी आपले सैन्य तयार केले. प्रचंड मुघल सैन्यावर हल्ला करण्याचा नवीन मार्ग त्यांना सापडला. त्यांनी आपल्या सैनिकांना गनिमी युद्धासाठी तयार केले जेणेकरुन त्यांना युद्धात कमीत कमी नुकसान सहन करावे लागेल.
औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपले सैन्य मुघल शासकाशी युद्धासाठी तयार केले. औरंगजेबाने जे किल्ले ताब्यात घेतले होते ते सर्व किल्ले त्यांनी पुन्हा जिंकले. १६७४ मध्ये ते रायगडचा राजा झाले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. अशा प्रकारे शिवाजींने प्रदीर्घ अंतरानंतर ‘हिंदू-पद-पादशाही’ स्थापन केली.
परकीयांना देशातून हाकलून देण्याचा त्यांचा प्रयत्न भारतीय कधीही विसरू शकणार नाही.
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -8
माझे आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मराठा साम्राज्याचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या १४ व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.
त्यांनी तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्य निर्मीतीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -9
परमप्रतापी अशा एका महान महापुरुषाची गाथा आपल्याला सांगणार आहे ज्याचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज
बहुगुणसंपन्न, शूर, बुद्धिमान, दयाळू शासक होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम वीर आणि लढवय्ये होते. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. जातीय वादात लोक अडकावे हे त्यांना मान्य नव्हते. स्त्रियांच्या आदराचे ते कट्टर समर्थक होते. हल्ला करताना कोणत्याही महिलेला इजा होऊ नये, अशा कडक सूचना त्यांनी सैनिकांना दिल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठा राष्ट्राचे निर्माते नव्हते तर मध्ययुगातील सर्वोत्तम मूळ प्रतिभा होते. महाराष्ट्रातील विविध जातींमधील संघर्ष संपवून त्यांना एकत्र बांधण्याचे श्रेय शिवाजीला जाते.
त्यांच्या विचारांची आज आपल्याला नितांत गरज आहे. असा राष्ट्रनिर्माता आपल्या देशाच्या मातीत जन्माला आला याचा आपणा सर्वांना अभिमान असायला हवा. अशी व्यक्तिमत्त्वे समाजात निर्माण करण्याची गरज आहे. मला आशा आहे की सर्व त्यांचे समृद्ध विचार अंगीकारून आपल्या देशाचे नाव जगात उंचावतील.
जय हिंद | जय शिवाजी..!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -10
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिकहो, शिस्तप्रिय जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय.
आज १९ फेब्रुवारी, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते.
त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते.
त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या.
त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजलखान, औरगंजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला.
दुर्देवाने ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि विचार आपल्याला प्रेरणादायी आहेत. अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे Pdf साठी क्लिक करा..
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिवाजी महाराज मराठी भाषण -11
शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिकहो, अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी..! शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर जिजाऊच्या पोटी झाला.
शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले.आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणीले.
6 जून 1674 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि सुमारेसाडे तीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या,जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने मिळाला.
शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता. शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. अफजलखान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्धी इब्राहीम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता.
शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता.अशाप्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते.
स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण...
मावळ्यांच्या मनात जागविला अभिमान,
शिवरायांचे गाऊ गुणगान
अतुल्य शौर्याची गाथा, घडविला महाराष्ट्र माझा
जय भवानी, जय शिवाजी...!!
❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
No comments:
Post a Comment