Monday, September 16, 2024

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती

 

   सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती... 

◆ जन्म :- २० जून १९५८

    या एक भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या स्वातंत्र्या नंतर जन्मलेल्या त्या सर्वात तरुण आणि राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहेत.  भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या प्रतिभा पाटील  यांच्यानंतर मुर्मू या दुसऱ्या महिला आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या.

        २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश  एनव्ही रमण यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या भारतातील आदिवासी समुदायातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत.

    २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला.  तर पहिल्या अनुसूचित जमातीच्या  (आदिवासी) व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या (तरुण) सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या  झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...