Friday, September 6, 2024

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांचा नाथा बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा...

गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया...

आपणांस व आपल्या परिवारास आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...


स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम्‌ ।

बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम्‌ ।

लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्‍नेश्वरं ओझरम्‌ ।

ग्रामो रांजण संस्थित: गणपति: कुर्यात्‌ सदा मंगलम्‌


 बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरते,

 दुःख आणि संकट दूर पळते

तुझ्या भेटीची आस लागते,

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते, णेश चतुर्थीला भेट घडते...

     दरवर्षी आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. आबाल वृद्धांचा लाडका गणपतीबाप्पा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.  गणपती हे महाराष्ट्राचेच काय तर संपूर्ण भारताचेच लाडके दैवत आहे. विघ्ने दूर करणाऱ्या गणपतीबाप्पाचे पूजन सगळ्या शुभकार्याच्या सुरुवातीला केले जाते


   तुमच्या आयुष्यातील आनंद, गणेशाच्या उंदराइतका विशाल असो, अडचणी उंदराइतक्या लहान होवो, आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो, प्रत्येक क्षण मोद‌कासारखा गोड होवो, 

  हीच बाप्पा चरणी प्रार्थना...🌹

   गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...