गणेश चतुर्थीला श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यामाग चे कारणही असे की, महर्षी व्यासमुनींनी महाभारत रचना करून ठेवलेली होती., एवढे मोठे महाभारत त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते , पण त्याची मांडणी त्यांना जमत नव्हती ., आणि म्हणून महर्षी व्यास मुनीनी श्री गणेशाची आराधना केली., आणि गणरायाला महाभारत लिहिण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
परंतु गणपती बाप्पांनी एका अटीवर व शर्तीवर महाभारत लिहिण्यास मदत करण्याचे मान्य केले.
ती अट म्हणजे , महाभारतातील प्रत्येक दृश्य मी आपणास खंड न पडता सांगेन , आणि आपणही न थांबता महाभारत न थांबता लिहावे., दोघांनीही अट मान्य केली.
अटीनुसार ठरल्याप्रमाणे महाभारत लिहायला सुरुवात झाली आणि तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी. भाद्रपद चतुर्दशीला महाभारताचे लिखाण अखंडितपणे सुरू झाले आणि संपूर्ण महाभारत दहाव्या दिवशी संपले तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध १४ . अर्थात अनंत चतुर्दशी. एका दिवसाचे २४ तास गुणीला १० दिवस . म्हणजेच एकुण २४० तास गणपती बाप्पांनी न थांबता ,न थकता महाभारताचे वर्णन करणे सतत सुरू ठेवले आणि संपूर्ण महाभारत कथन करून संपविले .प्रत्यक्ष देव जरी असले तरी ,त्यांचा ही देह हाडामासा पासुन च बनलेला .आणि दहा दिवस न थांबता सतत बोलल्यामुळे ,जागरण केल्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढले . त्यांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली., आणि गणपती बाप्पांच्या शरीराचा हा त्रास कमी व्हावा म्हणून महर्षी व्यासांनी गणपतीच्या संपूर्ण अंगास मातीचे लेपण केले.त्याच बरोबर शरीराचे तापमान कमी
होण्यासाठी त्यांच्या अंगावर कोवळ्या दुर्वा वाहिल्या .पण सततच्या मातीच्या लेपणाने. गणपती बाप्पांचे संपूर्ण शरीर ता ठरले. शरीराच्या तापमानामुळे त्यांच्या अंगावर लपलेली माती वाळल्याने गणरायांना खूप त्रास होऊ लागला.
करिता व्यासमुनींनी त्यांना संपूर्ण महाभारत लिहून झाल्यावर दहाव्या दिवशी म्हणजेच "अनंत चतुर्दशी" ला गणपती बाप्पाला पाण्यात बुडविले . आणि पाण्यामुळे माती भिजून सावकाश निघून गेली. त्यांच्या शरीराचे तापमान पूर्ववत झाले. आणि त्यांच्या अंगाची होणारी लाही लाही थांबली.
आणि अशा रीतीने संपूर्ण महाभारत सांगून पूर्ण करण्याचे कार्य ठरल्याप्रमाणे दहा दिवसात पूर्ण करण्याचे अलौकिक कार्य पूर्ण करूण स्वतःची कार्यक्षमता , आणि कार्यक्षमते बरोबरच कुशाग्र बुद्धिमत्ता ही सिद्ध केली.
No comments:
Post a Comment