धार्मिक कार्याचे सूत्रसंचालन

 किर्तन, भजन,  अखंड हरिनाम सप्ताहात नेहमी वापरण्यासाठी काही चारोळ्या , काव्य पंक्ती , अभंग, सुविचार..


एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही...!!

गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही...!!

मनी नवी उमंग आह
  प्रसन्न अंतरंग आहे !
  गोड हा प्रसंग आह
  नि आपला सुसंग आहे !!

  सर्व साधुसंतांच्या व सज्जनांच्या सहवासात संपन्न होत असलेल्या किर्तन/ भागवत सोहळ्यासाठी सर्वांचं सस्नेह स्वागत ! 

      राजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने जपल ती आई ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते राजाधिराज गणराज यांच्या पायी माझे मस्तकी दंडवत...

🙏आदरणीय ...... यांच्या बोधामृतापासुन जातीवंत हिंदुनी जागृत होऊन, सनातन हिंदु संस्कृती जोपासावी, आचरणात आणावी ,असेच हे बोधामृत आहे. .... यांचे शतशः अभिनंदन धन्यवाद. 🙏👍

सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते, त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही..
तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत छान जगा.
कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा...


🎤 भान हरपूनी खेळ खेळतो , दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा ।

भक्तीने भारलेला रिंगण सोहळा , पाहावा याची देही याची डोळा ।।


🎙 *खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।

*टाळ मृदंग घाई पुष्पांचा वरुषाव । अनुपम्य सुख सोहळा रे ।।


🎤 देहाला अंघोळ पाण्याची , मनाला अंघोळ नामाची ।

वरवर भक्ती नाही कामाची ।।

सत्संगतीत सदा राहावे, अंतर्मुख होऊनी पाहावे , मनोभावे भगवंताचे पूजन करावे ।।


🎙 जीवा-शिवाची जमेल जोडी , मना लागेल तेव्हा नामाची गोडी , सुंदर सुरेख बसेल जीवनाची घडी ।।


🎤 स्तुती सुमने सांगुन आठरा हजार श्लोकांनी,

रचिले हे महापुराण महर्षी वेदव्यासांनी ।

तीनशे पस्तीस अध्यायात मांडला विषय भक्तीचा,

ऐकून हे महापुराण मिळेल मार्ग मुक्तीचा ।

जरी बारा स्कंदातील विभीन्न स्कंदात,

सर्वांचे मन मोहतील श्री भगवान विष्णू लिलात ।

तरी दहावा स्कंद हा हृदय भागवताचा,

तिथे वर्णिल्या ललीत लिला भगवान श्रीकृष्णाच्या ।

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण
देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

🎙 श्री..........कृपेने आम्ही योजीले श्रीमद्भागवत...... गावी आमुच्या ।

तरी लाभ घ्यावा समस्त आप्त परीवारांनी , होईल उद्धार सात पिढीचा तुमच्या ।।


जेव्हा सांगतील सुमधूर वाणीतून प.पू.श्री.......महाराज श्रीकृष्ण कथा ।

तेव्हा ऐकता क्षणी ती रसाळ सुमधूर वचने , दूर होतील तुमच्या दुःख आणि व्याथा ।।

ठेवली आहे आम्ही श्रीमद् भागवत कथा, स्मरणार्थ आमच्या ....च्या ।

पूर्ण व्हावी आमच्या वडीलांची अंतीम ईच्छा, त्यासाठी योजीला हा सोहळा प्रित्यर्थ वडीलांच्या ।।


➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...