Friday, March 15, 2024

Sahid Diwas 23 March

  स्वातंत्र्य सैनिक शाहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू अमर रहे..


    “नमन माझे त्या देशभक्तांना आलिंगन दिले ज्यांनी मृत्यूला स्वातंत्र्य मिळवून दिले देशाला कोटी कोटी वंदन त्या विरपुत्रांना”
    भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च शहीद दिवस Sahid Diwas म्हणून साजरा केला जातो.
✿⭖⭖✿⭖⭖✿⭖✿⭖✿⭖⭖✿

◆ इंक़िलाब ज़िन्दाबाद ◆
शाहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची संपूर्ण माहिती वाचा... व भाषणे Pdf. डाउनलोड करा...

✿⭖⭖✿⭖⭖✿⭖✿⭖✿⭖⭖✿

       ●23 मार्च "शहीद दिन"●

     हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे स्मरण करू या, राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या महान क्रांतिकारक यांचे आज स्मरण करू या...!!

 ★ शहीद दिन इतिहास -

      1928 मध्ये भारतामधील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमिशन नावाचे शिष्टमंडळ आले होते भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाच्या काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला त्यावेळी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता सायमन  परत जा सायमन गो बॅक अशा या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लालालचपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तेच भक्तीने भारावलेले क्रांतिकार यांना हे सहन झाले नाही क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलीस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स  याला ठार मारण्याचे ठरवले त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून पोलिस अधिकाऱ्यांच्या निवास्थानी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्यांचा बळी घेतला. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली.

     देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत. इंग्रजी सरकारच्या 'पब्लिक सेफ्टी बिल अ‍ॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल' च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं. 
     या तरुण देशभक्तांचे फाशीनंतर तमाम भारतीयांच्या रक्तात आणखी पेटून उठला यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रकार झाली शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी 23 मार्च रोजी श्रद्धांजली वाहत हा दिवस "शहीद दिवस" म्हणून भारतीय साजरा करतात.

★ २३ मार्च १९३१ चा दिवस....

   संध्याकाळी अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीसाठी कोठडीबाहेर काढण्यात आले. भगतसिंगाच्या उजव्या बाजूस राजगुरू आणि डाव्या बाजूस सुखदेव होते . ते अतिशय शांतपणे आणि धैर्याने
' भारतमाता की जय ' आणि ' वंदे मातरम् ' चा जयघोष करीत फाशीच्या तख्ताकडे निघाले .

   मग भगतसिंग यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की , आपणास फाशी पूर्वी दोन मिनिटे आपल्या घोषणा करू द्याव्या. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने मौन राखून त्यांची ती विंनंती मान्य केली . तिघांनी मग जोरजोरात आपल्या घोषणा दिल्या. त्यानंतर ते तिघेही फाशीच्या तख्तावर चढले . त्यांचे पाय घोट्याशी  बांधण्यात आले . प्रत्येकाने आपल्या फासाचे चुंबन घेतले .

   फाशीची काळी टोपी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओढण्यात आली . नंतर ते फास त्यांच्या गळ्यात टाकण्यात आले. त्याची गाठ घट्ट झाली, तेव्हांच त्यांच्या घोषणा थांबल्या. त्यांचा आवाज क्षीण झाला. सगळीकडे शांतता पसरली  . तख्तावरचा खटका ओढला जाताच त्याच्या फळ्या दुभंगल्या नि ते तिघेही वीर मृत्युच्या खोल दरीत लोंबकळू  लागले . फळ्या पडण्याचा आवाज होताच तुरुंगाच्या सर्व कैद्यांनी आपल्या कोठाड्यांचे गज जोर जोरात वाजवून ' वंदे मातरम् ' "भारत माता की जय" च्या  घोषणा दिल्या .

    आणि मग काही वेळाने सर्वत्र स्मशानशांतता पसरली ...!!

 ★"२३ मार्च २०२४ अर्थात हुतात्मा दिन..."
  स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही लाहोर जेल मध्ये २३ मार्च १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी 'मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।' हे गाणे गायले होते.  'भारत माता की जय', 'वंदे मातरम' म्हणत हसत हसत फासावर चढले.

   धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां नंतर देशासाठी बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली त्यामुळेच आजचा दिवस 23 मार्च शहीद दिवस म्हणून साजरा केला.
पारदास्यत्वाच्या श्रृखंलेत अडकलेल्या मायभुमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी तुम्ही स्वतःचे प्राणर्पण केले व अमर झाले .

  आज तुम्ही ह्या जगात नाहीत पण तुमचा पराक्रम, तुमचे शौर्य, तुमचा त्याग आणि तुमचे बलिदान आम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रेरणा देत राहील.. आजही तुमची देशनिष्ठा भारतीयांच्या मनात जिवंत आहे...

   दोस्ती असावी तर तुमच्या सारखी जी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिल....

   भगतसिंग , सुखदेव , राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र त्रिवार अभिवादन...!!

                    🚩 वंदे मातरम् 🚩            ※══❖══▩۩۞۩▩══❖══※

        ★ भगतसिंग ★

◆नाव :~ भागनवाला
◆वडील :~ सरदार किशनसिंग संधू
◆आई :~ विद्यावती

●जन्म :~ २७ सप्टेंबर १९०७
गाव बावली जिल्हा लायलपूर,
पंजाब,पाकिस्तान

●मृत्यू :~ २३ मार्च १९३१
लाहोर, पंजाब, पाकिस्तान

◆संघटना :~ नौजवान भारत सभा,
कीर्ती किसान पार्टी, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

  भगतसिंह लहान असताना 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी शस्त्राच्या बळावर इंग्रजी व्यवस्था उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. भगतसिंहावर रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. भारतातही स्वांतत्र्यांनंतर समाजवाद रुजला जावा यासाठी ते प्रयत्नशील होते. ते केवळ एक क्रांतीकारक नव्हते तर एक विचारकदेखील होते. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.

भगतसिंग यांची संपूर्ण माहिती वाचा CLIK HERE

✿⭖✿⭖⭖⭖✿⭖✿⭖⭖✿⭖✿


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...