Sunday, March 3, 2024

संत गजानन महाराज

 

ण गण गणात बोते....🚩

समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगटदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!! 

‼️अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय‼️

 माघ कृष्ण पक्ष सप्तमी श्री अंनत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्रीगुरू गजानन महाराज शेगांव निवासी यांचा प्रकटदिन आहे...

"कोण हा कोठीचा काहीच कळेना | 

ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | 

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति | 

आलीसे प्रचिती बहुतांना ||" 

    आपुली लीला कस्तुरी

        मम वाणी मृत्तिका खरी

        परि मान पावेल भूमिवरी

        सहवासे या कस्तुरीच्या

       संत दासगणु...

गजानन महाराज महत्वाची संपूर्ण माहिती....

        माघ वद्य सप्तमी. संत श्री गजानन महाराज प्रकट दिन. आजच्या दिवशीच महाराजांचे १८७८ मध्ये 'श्री' चे प्रथम दर्शन झाले.

        आजचा दिवस अत्यानंदाचा. भौतिक जगातील कलह दूर करुन मनामनात भक्ती भाव जागविणारा. भक्तीच्या उर्जेने जीवनात चैतन्य निर्माण करणारा. यामुळेच भक्तांचा आनंद म्हणजे काय याचे सर्वत्र दर्शन घडतेय. शेगाव नगरीच सजलीय असे नाही तर देशविदेशातही या प्रकटदिन सोहळ्याचा उत्साह आहे. घरोघरी दिवाळीप्रमाणेच सडासमार्जन झालेय. रंगीबेरंगी रांगोळी.. मंदिरात फुलांची सजावट.. आरास झालीय.

        "संत संग देई सदा" असे तुकोबा म्हणतात हे त्रिवार सत्य. श्रद्धेने जीवनात सौख्य लाभते. लाखोंच्या वाणीला.. जीवनाला संत गजानन महाराजांच्या कस्तुरी लीला कृपेचा सुगंध लाभलाय. केवळ अन्न.. वस्र.. निवारा किंवा सत्ता.. संपत्ती हेच सुख नाही. जीवन उद्दिष्ट नाही. तर भक्ती मार्गानेच षड्रिपू विजय प्राप्त होत जीवन सुखी होते हा भक्तीमार्ग शिकवला तो श्री गजानन महाराजांनी. यामुळेच  कोट्यावधी भक्तांची जीवनात उत्तरोत्तर प्रगती होत आहे.. जीवन सुखी.. समाधानी.. आनंदी होत आहे.

        आज प्रकटदिनी हारफुलांनी सुशोभित 'श्रीं' च्या प्रतिमा.. मूर्ती समोर गजानन महाराज विजय ग्रंथ.. स्तोत्र.. बावन्नी इ. वाचन.. मनन.. श्रवण होत संकीर्तनात भक्तीचा आनंद भक्तगण लुटणार.

       संतांना ओळखणे अवघडच. पण बंकटलाल.. दामोदर.. हरि पाटील या भक्तांनी त्यांचे खरे स्वरुप जाणले. शेगावकरांच्या प्रेमामुळे ते बुटींच्या घरच्या पक्वानांच्या पंगती सोडून महाराज शेगावला भक्तांच्या उद्धारासाठी परतले. 

        महाराजांची आवड गरीब भक्तांची. अगदी साधी. पिठले- भाकर..अंबाडीची भाजी.. कांदा हा महाराजांचा आवडता नैवेद्य. महाराजांनी जीवनात कित्येक भक्तांना संकटातून सोडविले. आधार दिला. सन्मार्गाला लावले. महाराज त्रिकाल ज्ञानी. संतांच्या वागण्याचा अर्थ उमगत नाही. श्री गजानन महाराजांचे वागणे असेच होते त्यांच्या कृतीत चमत्कार जाणवायचे.       

        गजानन महाराजांच्या भक्तीने मन निर्मळ होते.  जगात कुणी शत्रूच उरत नाही. मनशांती लाभते.. आध्यात्मिक उन्नती होते. महाराज योगी.. भक्त मन जाणणारे अंतर्ज्ञानी. पशु.. पक्षी..निसर्ग यावर सत्ता चालविणारे ब्रह्मांडनायक. हो.. महाराजांना वाचासिद्धीच प्राप्त असल्याने जे बोलायचे ते सत्य व्हायचे.

        गजानन महाराजांच्या  लीलांचे प्रत्यंतर वारंवार येतच आहे. संत दासगणुंवर त्यांची कृपा झाली. २१ अध्यायी रसाळ भाषेतील 'गजानन विजय' ग्रंथ तसेच स्तोत्र, आरती लिहली. विजय ग्रंथ पारायणाने जीवनातील दूर होणारी संकटे.. प्राप्त होणारे आत्मबल.. सुख याचे निरंतर प्रत्यंतर कोट्यावधी भक्तांना येत आहे. विज्ञान युगातही भक्तांमध्ये जागणारा हा श्रद्धाभाव ही पण लीलाच. शिवशंकर भाऊंसारखे शेगाव संस्थानाला लाभलेले.. लाभणारे निस्पृह भक्त ही पण लीलाच.

        श्री गजानन महाराज संस्थानाचे समाजोपयोगी कार्य.. मंदिरात भक्तांना मिळणारी आपुलकीची वागणूक.. स्वच्छता.. पवित्र भक्तीमय वातावरण यामुळे जगभर प्राप्त झालेला लौकिक ही पण महाराजांची लीलाच.

        श्री गजानन महाराजांनी समाजात भक्तीसोबतच सेवाभाव रुजविलाय. मंदिरात मोफत सेवा देण्यासाठी हजारो भक्त प्रतिक्षेत असतात ही पण लीलाच.

        आज प्रकटदिनी दासगणुंच्या भाषेत हेच मागणे..

        आपल्या कृपे करुन

        सानंद राहो सदा मन

        सर्वदा घडो हरिस्मरण

        तैसीच संगत सज्जनांची.

        श्रीं च्या चरणी साष्टांग दंडवत. संत गजानन महाराजांची आपणावरही सदैव कृपा राहो...!!

गण गण गणात बोते...!!

⚜🌹🛕🌸🙏🌸🛕🌹⚜  

  जय जय सतचित स्वरूपा

  स्वामी गणराया ।

  अवतरलासी भूवर

  जड मुढ ताराया ॥

  जयदेव जयदेव


  निर्गुण ब्रह्म सनातन

  अव्यय अविनाशी ।

  स्थिरचर व्यापून उरलें

  जे या जगताशी ॥


  तें तूं तत्त्व खरोखर

  निःसंशय अससी ।

  लीलामात्रें धरिलें

  मानव देहासी ॥

  जयदेव जयदेव


  होऊं न देशी त्याची

  जाणिव तूं कवणा ।

  करूनी गणि गण

  गणांत बोतेया भजना ॥


  धाता हरिहर (नरहरी)

  गुरुवर तूंचि सुखसदना ।

  जिकडें पहावे तिकडे

  तूं दिससी नयना ॥

  जयदेव जयदेव


  लीला अनंत केल्या

  बंकट सदनास ।

  पेटविलें त्या अग्नीवाचूनी

  चिलमेस ॥


  क्षणांत आणिलें

  जीवन निर्जल वापीस ।

  केला ब्रह्मगिरीच्या

  गर्वाचा नाश ॥

  जयदेव जयदेव


  व्याधी वारून केलें

  कैकां संपन्न ।

  करविले भक्तालागी

  विठ्ठल दर्शन ॥


  भवसिंधू हा तरण्या

  नौका तव चरण ।

  स्वामी दासगणूचे


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...