"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महात्मा गांधी भाषणे

 महात्मा गांधी जयंती भाषण -1

 सत्य, अहिंसेचे धडे दिले जगतास..!

कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास...!!

 सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो.!

  आपण दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करतो. या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत.

  गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटीशशासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते १९१५ मध्ये भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनही ध्येय गाठता येते हे सिद्ध केले.

   महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग अवलंबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले. साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले. जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

  आता मला माझे भाषण संपवायचे आहे. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..! धन्यवाद..!

जय हिंद! जय भारत!

 ~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -2

ज्यांनी लिहिली

पारतंत्र्य मुक्तीची गाथा !

त्या राष्ट्रपिताच्या चरणी

विनम्र माझा माथा !!

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो.! सर्वांना माझा नमस्कार!

    आज 02 ऑक्टोबर, आज मी आपणांसमोर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते सत्य व अहिंसेची पुजारी राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांच्या विषयी आपणास समोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

धोती वाले बापू की

ये ऐसी लढाई थी!

न गोले बरसाये उन्होंने

न बंदूक चलाई थी!!

सत्य अहिंसा के बल पर ही

दुश्मन को धुल चटाई थी !!!

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडतात आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.

   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते.

  त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

  त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जावो, भारत छोडो या घोषणा दिल्या. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.

   महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासीयांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांना जनतेने महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या बहाल केल्या. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम.!!

जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

 ~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -3

   सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार.! आजच्या दिवशी मी तुम्हाला आपले सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो, यांच्या विषयी माझे विचार व्यक्त करणार आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी अपेक्षा…!

    अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शतशत प्रणाम.!

त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमानसात त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुगावरून दिसून येते.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की –

बापू सन्मान करतो आम्ही,

तुमच्या महान नेतृत्वाचा..!

भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला,

हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा..!!

 

आजच्या या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

 ~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -4

    आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो मी (नाव) आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे “राष्ट्रपिता महात्मा गांधी" आज ज्यांची जयंती आहे. जगाला सत्याग्रहा बरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस . जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.

   माहात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६१ साली गूजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव

करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा कस्तुरबा माखनवाला यांच्याबरोबर बालविवाह झाला.

शालेय शिक्षण संपवून वयाच्या १९व्या वर्षी १८८८ मध्ये गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

   रवींद्रनाथ ठाकूर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा ही उपाधि

दिली. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा . लोक

गांधीजीना बापूजी ही म्हणत. १९४४ साली नेताजी सुभाषचंद्र बोसयांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले .

   अंहिसेच्या तत्वावर आधारित

सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील

भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर १९१५ मध्ये भारतात  परतल्यानंतर त्यांनी चंपारणमधील  शेताकऱ्यांना जुलमी कर आणि जमिनदार यांच्याविरोधात एकत्रकरुन लढा दिला. त्यांनतर गांधीजीनी दांडी यात्रा , भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधिरित आंदोलांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले . गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्व:त ती तत्वं जगले.

    ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असताना नथुराम गोडसे या युवकाने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. आणि एका युगपुरूषाचा अंत झाला .

 ~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -5

कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन उपस्थित सर्व मान्यवर गण आणि माझ्या  मित्र मैत्रिणींनो.!

आज 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.

    मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे पोरबंदर मध्ये प्राथमिक तसेच राजकोट मध्ये माध्यमिक शिक्षणा झाले. ते मॅट्रीकची परिक्षा भावनगर मधील सामलदास कॉलेज मधून पास झाले.

  इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.

   ते भारतीय राष्ट्रीयकाँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. पण  भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.

स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कपड्यांना

विरोध केला आणि खादीचा पुरस्कार केला. गांधीजी चरख्यावर स्वत : सूत कातत.

~~~~~~~~

 महात्मा गांधी जयंती भाषण -6

    सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो.. आज गांधी जयंती. जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस . जगभरात आजचा

दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

   माहात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६१ साली गूजरात मधील पोरबंदर शहरात झाला.

गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले.

   मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवन दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

  ३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली.

 ~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -7

  आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो.! सर्वांना माझा नमस्कार

  देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महात्मा गांधी यांचा वाढदिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून देखील साजरा केला जातो.

   महान कार्यामुळे लोक त्यांना "बापू" म्हणू लागले. त्यांना "महात्मा" "राष्ट्रपिता" अश्या उपाधी मिळू लागल्या.  अहिंसा, सत्य आणि स्वच्छता ह्या तत्वांवर त्यांचा खूप विश्वास होता. 

अश्या ह्या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन !

जय हिंद.. जय महाराष्ट्र..!!

~~~~~~~~

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती  मराठी भाषण -8

  सुप्रभात, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग, शिक्षक आणि मित्रांनो. आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहोत, ज्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता. त्यांच्या सत्य, अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या तत्त्वांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे हा दिवस आपल्या इतिहासातील ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला.
    महिलांचे हक्क, दारिद्रय निर्मूलन, धार्मिक स्नेह, प्रामुख्याने स्वराज्य प्राप्ती यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.त्यांनी सत्य, अहिंसा ही तत्वे जगाला दिली. असहकार आंदोलन, चलेजाव  चळवळ यामुळे संपूर्ण भारत पेटून उठला. त्यामुळे इंग्रजांना आपल्या देशातून काढता पाय घ्यावा लागला.
   राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंती निमित्ताने भावपूर्ण आदरांजली.

~~~~~~~~
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती  मराठी भाषण -9
      २ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस "आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन" म्हणून  संपूर्ण जगभर साजरा केला जातो. १५ ऑक्टोबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने गांधीजींचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून घोषित करण्याचे ठरवले त्यास सर्व सदस्यांनी संमती दिली. भारतात सर्वधर्मीय प्रार्थना, प्रभात फेऱ्या, सूतकताई करुन हा दिवस साजरा केला जातो.
    महात्मा गांधी यांचा आज जन्मदिवस आहे, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, त्यांना राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते. महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे महान नेते होते. त्यांचा सत्य आणि अहिंसेवर विश्वास होता. त्यांनी आम्हाला दयाळूपणे वागायला आणि नेहमी सत्य बोलायला शिकवले. त्यांनी अनेकांना प्रेम आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.
   चला हा दिवस आनंदाने साजरा करूया आणि महात्मा गांधींच्या महान कार्याचे स्मरण करूया! सर्वांना 'गांधी जयंती'च्या खूप खूप शुभेच्छा..! धन्यवाद..!!

~~~~~~~~

~~~~~~~~

~~~~~~~~



No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...