भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते ते स्वतंत्र भारताचे महान पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रवास ही आधुनिक भारताच्या जडणघडणीची एक यशस्वी कहाणी आहे. पारतंत्र्यातून नुकत्याच मुक्त झालेल्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि सहिष्णुतेच्या आदर्श मूल्यांनी अलंकृत केले.
अवघी १२% साक्षरता असलेल्या भारताला त्यांनी IIT, IIM आणि AIIMS सारख्या शिक्षण संस्थांची देणगी दिली. भाक्रा-नांगल धरणासारखी अनेक 'आधुनिक भारताची मंदिरे' त्यांनी उभारली. आपल्या संशोधनातून आणि तांत्रिक प्रगतीतून जगाला अचंबित करणाऱ्या भारताच्या वैज्ञानिक संस्था या नेहरूंच्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपाक आहेत.
दोन महासत्तांच्या अंकित न राहता नेहरूंनी जगातील अनेक देशांसमोर ‘अलिप्ततावादी चळवळ’ हा शांतता, सहकार्य आणि परराष्ट्र धोरणातील स्वातंत्र्य या मूल्यांनी युक्त तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे 'आधुनिक भारताचे शिल्पकार' पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

No comments:
Post a Comment