कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ॥
मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम् ॥
तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैवच ॥
या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणी गडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथ् साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...
★पहिले शक्तीपीठ ★
💎कोल्हापूरची महालक्ष्मी -
कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. ती ना शिवपत्नी ना विष्णूपत्नी. ती साक्षात त्रिदेव-देवी व सर्व देवतांची आई आहे.
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
●कोल्हापूरची महालक्ष्मी सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩★दुसरे शक्तीपीठ★
🔵श्री.क्षेत्र माहूरची रेणुकामाता-
ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका देवीला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतीतांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते.
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
●माहूर गडची रेणुकामाता सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
★तिसरे शक्तिपीठ ★
🟢तुळजापूची श्री अंबाबाई -
तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.
तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
●तुळजापूची श्री अंबाबाई सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
★ चौथे अर्धपीठ ★
🔴वणीची श्री सप्तश्रृंगी -
हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे.
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
●वणीची श्री सप्तश्रृंगी सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
No comments:
Post a Comment