"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Monday, October 21, 2024

भारतीय पोलीस स्मृती दिन

 

"२१ ऑक्टोबर" भारतीय पोलीस स्मृती दिन -

    अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतात पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व पवित्र असा दिवस समजला जातो. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी पोलीस दलातील १० शिपाई लडाख हद्दीत भारत आणि तिबेट सिमेवर व १६ हजार फुट उंचीवर दोन हजार पाचशे मैलाच्या हॉटग्रीन या सिमेवर बर्फाच्छादीत अत्यंत निर्जन कडाक्याच्या थंडीत गस्त घालीत असताना धोकादायक पध्दतीने दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकाच्या हल्ल्यात शहिद झाले. या दिवसाची आठवण राहावी तसेच देशामध्ये आतंकी हल्ल्यात नक्षलवादी कार्यवाहीत, समाजकंटक व हिंसक कृत्ये करणाऱ्या कडून कर्तव्यावर असलेल्या शहीद जवानाच्या स्मृतीला उजाळा देण्यात येतो. आपल्या मातृभुमीचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्र निष्ठा ठेवून अनेक जवान शहीद होत असतात, तसेच पोलीसांना कायदा व सुव्यवस्थे बरोबर गुंड, अतिरेकी, दहशतवाद व समाजद्रोही लोकांचा सामना करावा लागतो.  त्यांना या दिवशी कृतज्ञतापर्णू स्मरण करण्यात येते, तसेच त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन अभिवादन करण्यात येत असते. या दिवशी त्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. 

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

राष्ट्रीय शिक्षण दिन

  ११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  मौलाना अबुल कलाम आझाद     यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्री...