जागतिक महिला-दिन

 

८ मार्च 'जागतिक महिला-दिन'

"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 
तो जिजाऊचा शिवबा झाला, 
ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 
तो राधेचा श्याम झाला, आणि 
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 
तो सीतेचा राम झाला !'

      प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !

  तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान"
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...!!
~~●~~~~●~~

 भारतीय संस्कृतीची जगभर ख्याती, स्त्रियाही लढल्या घेऊनी तलवारी हाती, माऊलींच्या रुद्रावतारा पुढे लाजल्या तलवारीच्या ही पाती..!
       जागतिक महिला दिनानिमित्त सर्व स्त्रीशक्तींना  साष्टांग दंडवत..!
*कधी शौर्याची ढाल
*कधी मायेची ऊबदार शाल,
*प्रत्येक स्त्रीच्या
*आत्मविश्वासाला सलाम..!
    पुरुषांच्या तुलनेत नेहमीच महिलांचे कष्ट जास्त राहिले.पण तिच्या कर्तृत्वाची दखल आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने कधी घेतली नाही.कालौघात काहींनी बंधन झुगारून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं. स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष करत आपलं असं आभाळ बनवलं की तिची आकाशभरारी क्षितिजापार गेली तरीही आई, बहिण, पत्नी, मुलगी ही निसर्गनिर्मित पाऊलवाट मात्र कायम राहिली.या निसर्गदत्त देण्यालाही पुरेपूर खरं उतरून आपली ओळख कायम राहावी यासाठी तिचे हे कष्ट आजही अव्याहत सुरूच आहेत...
    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही.  बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले..

◆ महिला दिन ◆  

कधी ती प्रेमाने डोक्यावर हात ठेवणारी आई असते,
कधी ती घासातला घास काढून देणारी 
ताई असते,
काळजी नको मी आहे ना म्हणणारी 
मैत्रीण असते,
कधी ती अधाऀगिनी म्हणून साथ देणारी बायको असते,
तर कधी बाबा लवकर या म्हणणारी 
लेक असते,
अशा एक ना एक अनेक भुमिका मनापासून बजावणारी नारी शक्तीला मानाचा मुजरा. 🙏🏻
              
कधी शौर्याची ढाल
कधी मायेची ऊबदार शाल,
प्रत्येक स्त्रीच्या
आत्मविश्वासाला सलाम..!

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे असावे..!!
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व हे सारे असावे...!!

    पुरुषांच्या तुलनेत नेहमीच महिलांचे कष्ट जास्त राहिले. इतिहास साक्षी आहे काहींनी बंधन झुगारून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं. स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष करत आपलं असं आभाळ बनवलं की तिची आकाशभरारी क्षितिजापार गेली तरीही आई, बहिण, पत्नी, मुलगी ही निसर्गनिर्मित पाऊलवाट मात्र कायम राहिली. या निसर्गदत्त देण्यालाही पुरेपूर खरं उतरून आपली ओळख कायम राहावी यासाठी तिचे हे कष्ट आजही अव्याहत सुरूच आहेत...

    स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वास्तल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व, स्त्री म्हणजे अडथळ्यावर मात... 
     प्रत्येक नारीला तिच्या कर्तुत्वाला तिच्या नेतृत्वाला तिच्या सहनशक्तीला तिच्या त्यागाला तिच्या प्रेमाला तिच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा...!!
     मातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व या गुणांचा संगम असलेली महान शक्ती म्हणजे नारीशक्ती...
जागतिक महिला दिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!


     'जागतिक महिला-दिन'  

   ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

~~●~~~~●~~

" महिला दिन संपूर्ण माहिती व भाषणे  साठी क्लिक करा..     

   

~~●~~~~●~~

      स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.


      भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही  ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .

     १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने  आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.

~~●~~~~●~~

"जागतिक महिला दिन"  प्रभावशाली भाषणे साठी क्लिक करा..      

  

~~●~~~~●~~


~~●~~~~●~~

"ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे"
~~●~~~~●~~

"आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणू तू, जगत जननी तू,
मावळ्यांचा भवानी तू,
प्रयत्नांनाा लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू...!!
~~●~~~~●~~

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा प्रणाम...!!
~~●~~~~●~~

"तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे विसावे...!!
~~●~~~~●~~

"स्त्री म्हणजे वास्तव्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कतृत्व,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
~~●~~~~●~~

"आईच्या वात्सल्याला प्रणाम
बहिणीच्या प्रेमाला प्रणाम
मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम...
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"...!!
~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

" महिला दिन संपूर्ण माहिती व भाषणे  साठी क्लिक करा..     

   

~~●~~~~●~~

 जगात सर्वत्र महिला दिना निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विविध संघटना, कार्यालये इतकच काय तर घराघरांमध्ये महिलांप्रती आदरभाव व्यक्त करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी ठराविक संकल्पनेवर आधारीत या दिवसाचं नियोजन केलं जातं. त्यापुढे संपूर्ण वर्षभर संबंधिक संकल्पनेनुसार समाज जागृतीचे उपक्रम हाती घेतले जातात.

    जागतिक महिला दिनाला अनेक देशांमध्ये महिलांना सुटी दिली जाते. रशियात हा दिवस अधिक उत्साहाने साजरा केला जातो. तर चीनमध्ये अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुटी दिली जाते. अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वूमन्स हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च या दिवशी अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करणारं मानपत्र काढलं जातं.

    आज पर्यंत विविध क्षेत्रात महिलांनी केलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे,  म्हणूनच म्हणावेसे वाटते...


'तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,
गंगनही ठेंगणे असावे.
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे विसावे!"


  आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...