भूमिपूजन कार्यक्रम सूत्रसंचालन

 स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम....!!

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून मी सतीश बोरखडे पवनसुत वज्र्य हनुमान मारुती सांस्कृतिक भवन कामाचा भूमिपूजन  सोहळा कार्यक्रमाला सुरुवात करतो...!!

   आज उपस्थित सर्व मान्यवर व सर्व अंबिका नगरवासी यांच्या साक्षीने अंजनी सुत वज्र हनुमान मारुती मंदिर येथे सांस्कृतिक भवन (५० लक्ष रुपये) कामाचा भूमिपूजन सोहळा...!!

कार्यक्रमाचे अध्यक्ष-

    दारव्हा दिग्रस मतदारसंघातील 

सामाजिक व विकास कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण करणारे. 

आपल्या कार्याने समाजात आपली अमिटं छाप निर्माण करणारे विकास पुरुष,  कर्तबगार लाडके आमदार मा.ना.श्री. संजय राठोड मृदू व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो. 

★उदघाटक - भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माननीय श्री...... यांनी स्थान ग्रहण करावे.

प्रमुख पाहुणे - 

  कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, कार्यप्रणव मा. श्री………. हे व्यासपीठावर प्रमुख अतिथी स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो.

1)मा.श्री. रवी काळे कार्यकुशल तहसीलदार दारव्हा, 

2)मा.श्री. राजू शिंदे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी पंचायत समिती दारव्हा,

3)मा.श्री. विठ्ठल केदारे मुख्याधिकारी न.प. दारव्हा, 

४)मा.श्री. श्रीधरकाका मोहोळ जिल्हा प्रमुख शिवसेना यवतमाळ माजी शिक्षण व आरोग्य सभापती यवतमाळ,

5)मा.श्री. कालींदाताई यशवंत पवार माजी जि. प.अध्यक्ष यवतमाळ, 

6) तरुण तडफदार मा.श्री. मनोज सिंगी शिवसेना तालुका प्रमुख दारव्हा, 

7) युवा नेतृत्व मा.श्री. राजू दुधे शिवसेना शहर प्रमुख दारव्हा, 

8) मा.श्री इरवे काका माजी न.प. अध्यक्ष

★प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन -

    काळ्याकुट्ट भूतकाळाच्या छाताडावर वार करुन हिंदुस्थानचे उज्वल भविष्य घडवत सोन्याच स्वराज्य उभे करणारे न भुतो न भविष्यती असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व

दीपप्रज्वलन व्यासपीठावरील अध्यक्ष व सर्व मान्यवरांनी करावे... अशी मी त्यांना विनंती करतो. 

ज्योत तेवते समतेची... ज्योत तेवते त्यागाची... ज्योत तेवते क्रांतीची अन् समर्पणाची... या ज्योतीने एकच संदेश दिला आहे.... स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं.... आणि म्हणूनच या दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आपण कार्यक्रम साजरा करणार आहे...

★पाहुण्यांचे स्वागत -

अतिथिंच्या आगमनाने... 

हर्षित झाला सारा मेळा...!! 

धन्य धन्य होऊनी आम्ही करितो...

हा स्वागताचा सोहळा...

हा पाहुण्यांच्या स्वागताचा सोहळा...!!

     सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा.ना.श्री. संजय राठोड मृदू व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत मंदिर समिती अध्यक्ष श्री...... हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

◆यानंतर उद्घाटक आणि इतर पाहुण्यांचे जेष्ठतेनुसार स्वागत घ्यावे...

★ प्रस्ताविक - 

   सामाजिक कार्य ज्यांचा पिंड आहे सामाजिक चळवळीत अग्रक्रमाने सहभागी असणारे मा.श्री. ...... यांनी प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करतो.

★ मान्यवरांचे मनोगत-

  सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. मा.श्री. श्रीधर काका मोहोळ जिल्हाप्रमुख शिवसेना यवतमाळ माजी शिक्षण व आरोग्य सभापती यवतमाळ यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.

◆ यानंतर इतर मान्यवरांना मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करावे

 ★ अध्यक्षीय भाषण - 

आपका लक्ष्य एक कदम विकास की ओर !

अंधेरी ठहराव से प्रकाश की ओर !!

आपके प्रयास से दारव्हा जा रहा तारक्की की और !! 

हम सब और सभी लोग आपके साथ है...

सबको उम्मीद है आप ही जीतोंगे 

बस आप उम्मीद से बेहतर चलो विश्वास की ओर !!

कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा.ना.श्री. संजय राठोड मृदू व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपले विचार व्यक्त करावे.

★ भूमिपूजन सोहळा -

 व्यासपीठावरील अध्यक्ष व सर्व मान्यवरांनी भूमिपूजन कार्यक्रमासाठी पुढे यावे ही विनंती....

★ आभार प्रदर्शन -

थेंबाथेंबाने तलाव भरतो... 

हाताहाताने कार्यक्रम फुलतो... 

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार... 

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार..!!

    आभार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो मा.श्री. ....... यांनी आभार प्रदर्शन करावे ही विनंती... धन्यवाद...!!

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...