"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Marathi Bhashne

 

 ज्ञानाच्या अथांग महासागराला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला, विनम्र अभिवादन...!!

💐💐🙏🏻★🙏🏻💐💐


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -1
कार्यक्रमाचे अध्यक्ष,  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, परम पूज्य गुरुजन, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थित  माझ्या  मित्र मैत्रिणींनो.!
भारतीय संविधान लिहिणे हे बाबासाहेबांच्या कार्यातील अत्युच्च शिखर होय. भारतीय संविधान सभेत निवडून येण्यासाठी त्यांना काय प्रयत्न करावे लागले, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तरुणांनी तो इतिहास आवर्जून वाचवा, जेणेकरून बाबासाहेबांना ही सर्व कामे करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता, हे लक्षात येईल. हे संविधान लिहिताना त्यांनी केवळ अनुसूचित जातींच्या लोकांचाच विचार केला नाही. तर आखिल भारतातील आदिवासी, इतर मागास वर्गीय, विविध जातीधर्मातील लोकांना समान संधी उपलब्ध करून दिल्या आहे. या सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत अभासपूर्वक केल्या आहेत. यावरूनही आपल्या लक्षात येते कि त्यांचे हे महान कार्य केवळ एका जातीच्या लोकांपुरते मर्यादित नव्हते तर ते सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी होते.
आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या आहेत. बॅरिस्टर बनून त्यांनी दलितांना हक्क मिळवून दिला. समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. शुद्रांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याची मनाई होती. परंतु बाबासाहेबांनी आंदोलन करून सर्वांकरिता पाणी पिण्यासाठी खुले केले. ही घटना चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांचा धैर्याने सामना केला आणि प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून यश संपादन केले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाही.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला कोटी कोटी शुभेच्छा !

~~●~~~~●~~

"14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा    

~~●~~~~●~~


~~●~~~~●~~

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -2
    सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या सर्व बालमित्रांनो.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दिन दलितांचे जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखळदंड तोडणारा महायोद्धा,  दिन-दलितांचा कैवारी, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य यांच्या जयंतीनिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही विनंती...

१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांची जयंती उत्सवात साजरी केली जाते.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.
आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा
 खरा महामानव होतास...
ज्ञानाच्या अथांग सागरास  विनम्र अभिवादन ..!!
~~●~~~~●~~

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -3
कार्यक्रमाचे अध्यक्ष,  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, परम पूज्य गुरुजन, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थित  माझ्या  मित्र मैत्रिणींनो.!
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते लहानपणीपासूनच खूप बुद्धिमान व महत्त्वकांशी विचार श्रेणीचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत डगमगले नाहीत त्यांनी अस्पृश्यता दिन दलितांच्या उद्धारासाठी हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले.
     भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला गोरगरीब तीन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने सत्याग्रह केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणारे मनुस्मृती या ग्रंथाची जाहीर रित्या होळी केली नाशिक काळाराम मंदिरामध्ये दीनदलितना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने ठिकारलेल्या समाजासाठी ते असेच किरण बनले मूकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले त्यांनी समाजप्रबोधनाची बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला
असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या महामानवास ज्ञान संवादी तपस्वी अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी योग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
   1991 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम..!
~~●~~~~●~~

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -4

    कार्यक्रमाचे अध्यक्ष,  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास उपस्थित  माझ्या  मित्र मैत्रिणींनो.! उपस्थित सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

   भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. दलित कुटुंबात जन्मलेल्या भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेसारख्या सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागले. शाळेतही दलित असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या, असे असतानाही त्यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शिक्षण पूर्ण केले आणि मेहनत आणि झोकून देऊन सुमारे ३२ पदवी संपादन केली. परदेशातून डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर ते मायदेशी परतले आणि त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी आवाज उठवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांचा धैर्याने सामना केला आणि प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून यश संपादन केले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्या जयंतीच्या या विशेष प्रसंगी आपण सर्व त्यांच्या कार्याचा उजाळा करत आहोत.

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास अभ्यास करत होते. त्यांनी अनेक विषयावर संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी अनेक विषयावरील पुस्तकांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक वृत्तपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये लेखन केले आहे.

   स्वतःच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.

~~●~~~~●~~

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -5
   डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
कार्यक्रमाचे अध्यक्ष,  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन, माझ्या  मित्र मैत्रिणींनो.!
    अंधारातल्या झोपडीत ज्ञानाचा सूर्य ओतून संपूर्ण मानव जातीला प्रकाशमान करणारे..!! महामानव !! युगपुरुष !! क्रांतिसूर्य!! बोधीसत्व !! भारतरत्न !! विश्वरत्न !!  राष्ट्रनिर्माते !! भारतीय घटनेचे शिल्पकार !! परमपूज्य !!! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त  उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
   भिमरावांनी आपले उच्य शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलेबिया विद्यापीठातून व इंग्लंड मधील विद्यापीठातून घेतले . नंतर ते मायदेशी परतले. त्यानी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.

~~●~~~~●~~

"14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा    

~~●~~~~●~~


     बाबासाहेबांनी भारतातील जातीव्यवस्था, उच्च-नीचता कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक समाज सुधारकांनी भारतातील जातिव्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला. भारतात स्त्रिया व शूद्रांना दिली जाणारी हीन वागणूक त्यांनी लहानपणापासून अनुभवलेली होती.

~~●~~~~●~~

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -6
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन, माझ्या  मित्र मैत्रिणींनो.!
   विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण,  राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेहीत्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देशहिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला. अशा महामानवाच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा एवढे बोलून माझे दोन शब्द बंद करतो.
 ~~●~~~~●~~

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -7

  सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो... जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा..!!

    दलित कुटुंबात जन्मलेल्या आंबेडकरांना लहानपणापासूनच जातिव्यवस्थेसारख्या सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागले, असे असतानाही त्यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शिक्षण पूर्ण केले आणि सुमारे ३२ पदवी संपादन केली. परदेशातून डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर ते मायदेशी परतले आणि त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी झगडले.

    आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती नेमण्यात या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते; तर घटना समितीमध्ये प्रत्यक्ष घटना लिहिण्याचे काम मसुदा समितीकडे होते आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर .  बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनेचा मसुदा तयार केला. त्यांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस मेहनत घेवून राज्यघटना तयार केली.
संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने ही घटना स्वीकारली. व 26 जानेवारी 1950 पासून ही घटना आपल्या देशामध्ये लागू करण्यात आली. भारतीय संविधानाची निर्मिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला.

 ~~●~~~~●~~

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -8
    जमिनोधस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करुन
 ज्ञान,जिद्द नि त्यागाने नवक्रातीचा हिमालय उभा करणाऱ्या
 विश्ववंदनिय परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
 जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला कोटी कोटी शुभेच्छा !
    सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो...
   मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित , राजनीतिज्ञ , लेखक, समाज सुधारक ,स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडगारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा  ,अस्पृश्यता मिटनवण्यासाठी चंदनापरिस आपला जीव झिजवणारे , आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझे दोन शब्द बंद करतो धन्यवाद..!!
~~●~~~~●~~

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -9
   सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो...
देशप्रेमापुढे ज्याने स्वतः च्या विश्रांतीचा त्याग केला ,
माणसाला स्वाभिमान शिकवला,
ज्यांनी आम्हांला संकटाशी सामना करणे शिकवले,
असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता."
   डॉ बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती" या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत है साप्ताहिक तर समता हे वृत्तपन्न सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहूमल्य कार्य केले.स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला.
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म ,आम्हाला न्याय देऊन गेला.. 
जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला.. 
आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला...
जय भिम!
~~●~~~~●~~

"14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा    

~~●~~~~●~~


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण -10 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
कार्यक्रमाचे अध्यक्ष,  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन, माझ्या  मित्र मैत्रिणींनो.!
     बाबासाहेबांची वैशिष्टे सांगायची तर बाबासाहेब हे महान संशोधक, विश्वरत्न, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, पञकार, समाजशास्ञज्ञ, अर्थशास्ञज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्वज्ञानी, मानववंश शास्ञज्ञ, दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक, देशातील पहिले कामगार मंञी, संस्कृत व हिंदी साहित्याचे अम्यासक, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंञ्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्त्ये, गोरगरीब कामगारांचे उद्धारक होते.
     व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझी दोन शब्द बंद करतो धन्यवाद...!!
~~●~~~~●~~


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...