"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शिवाजी महाराज शायरी

इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले

@@@@@

    म्हणून एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, 

नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा.!! मानाचा मुजरा.!!

@@@@@

आणि म्हणून म्हणावेसे वाटते

 थोर तुमचे कर्म, जिजाऊ तुझे उपकार कधी फिटणार नाही. सूर्य चंद्र असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही ..!

@@@@@

''जेव्हा निश्चय पक्का असेल 

तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगाऱ्यासारखा भासेल''

@@@@@

शिस्तप्रिय जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय.

@@@@@

हवा वेगाने नव्हती….

हवेपेक्षाही त्यांचा वेग होता,

अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा …

त्यांचा नेक होता…

असा जिजाऊंचा छावा,

लाखात नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता…!!


@@@@@

ताशे तडकणार, हृदय धडकणार….

मन थाडे भडकणार….

पण या देशावरच काय….

अख्या जगावर….

१९ फेब्रुवारीला भगवा झंडा फडकणार !!


@@@@@

सहयाद्रीच्या रांगावरती….

सदा मुघलांच्या नजरा !

बोट छाटली तयांची….

त्या शिवबांना माझा मुजरा !!


@@@@@

सह्याद्रीच्या कुशीतून,

एक हिरा चमकला,

भगवा टिळा चंदनाचा,

शिवनेरीवर प्रकटला,

हातात घेऊन तलवार,

शत्रूवर गरजला,

महाराष्ट्रात असा एकच,

शिवाजी राजा होऊन गेला ….


@@@@@

शब्दही अपुरे पडती,

अशी शिवबांची किर्ती !

राजा शोभून दिसे जगती,

अवघ्या जगाचे शिवछत्रपती !!

@@@@@

कलम नव्हते, कायदा नव्हता,

तरीही सुखी होती प्रजा ….

कारण सिंहासनावर होता,

माझा छत्रपती शिवाजी राजा !!


@@@@@

सिंहाची चाल, गरूडाची नजर,

स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन,

असेच असाव मावळ्यांचे वर्तन,

हीच शिवरायांची शिकवण ..


@@@@@

आले किती, गेले किती,

उडून गेले भरारा….

संपला नाही आणि संपणारही नाही,

माझ्या शिवबाचा दरारा….


@@@@@

लखलखणारी तलवार पाहून,

व्हायचे शत्रू ढेर…..

जिजाऊचा शिवबा होता,

शेरांचा सव्वाशेर ! “


@@@@@

शब्दही अपुरे पडली…

अशी शिवबाची किर्ती,

राजा शोभुनी दिसे जगती..

असे ते शिवछत्रपती !


@@@@@

त्यावेळी पण ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार हि सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण

स्वराज्य निर्मितीची बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती.

@@@@@

एक एक किल्ला नेहाळावा आठवा शिवरायांचा कारभार”

“दिली उभारी मनाला, झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार.!

हर हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर..!

@@@@@

“भवानी मातेचा लेक तो….

मराठ्यांचा राजा होता,

झुकला नाही कोणासमोर….

मुघलांचा तो बाप होता !”


@@@@@

    शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची किर्ती.! राजा शोभून दिसे जगती..! असा तो शिवछत्रपती..राजे असंख्य झाले आजवर या जगती..! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती..!


@@@@@



@@@@@


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...