शिक्षक दिन सूत्रसंचालन 🎤

" ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ||

गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

प्रस्तावना /प्रारंभ-

    "नमस्कार, मान्यवर उपस्थित गुरुजन, प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सहकाऱ्यांनो.
आज आपण एका विशेष प्रसंगी येथे एकत्र आलो आहोत. हा दिवस आहे ५ सप्टेंबर, भारताचे महान तत्त्वज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा. हा दिवस आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करतो.

 पाहूणे स्थानापन्न करणे 

  - "हिऱ्याशिवाय कुंदणाला शोभा नाही... गोडीशिवाय ऊसाला शोभा नाही...!!  सुगधांशिवाय फुलाला शोभा नाही... तसेच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमालाही शोभा नाही...!!  म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय.... यांनी स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.
   यानंतर प्रमुख पाहुण्यांना सन्मानपूर्वक मंचावर निमंत्रित करावे.

🪔 दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना

       "आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करणार आहोत. ज्योती म्हणजे ज्ञान, आणि अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याचं प्रतीक.
माझं विनम्र आग्रह आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करावी.   
                     त्यानंतर आपण सरस्वती वंदना ऐकू."

 प्रमुख अतिथींचे स्वागत - 

अतिथिंच्या आगमनाने... हर्षित झाला सारा मेळा...!!  धन्य धन्य होऊनी करितो... हा स्वागताचा सोहळा... हा स्वागताचा सोहळा...!!
✪कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत घ्यावे.

 प्रास्ताविक भाषण :~
   "आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो  श्री/सौ. ______ यांना."

❀  गुरूंचा सत्कार-

   गुरुशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञानाशिवाय जीवन नाही. म्हणूनच हा दिवस गुरुजनांना सन्मान देण्याचा आहे."

"गुरु म्हणजे फक्त पुस्तक शिकवणारे शिक्षक नव्हे, तर जीवन घडवणारे शिल्पकार असतात.
   त्यांचं योगदान अमूल्य आहे. आज त्यांच्या चरणी आपलं मनःपूर्वक आभार व्यक्त करायचे आहे.
   आपल्या आदरणीय गुरूंचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी माननीय..... गुरुवर्य यांचा सत्कार करावा..

 प्रमुख अतिथी भाषण-

"आता मी आमचे आदरणीय प्रमुख पाहुणे ___ यांना मंचावर बोलावतो, जे आपल्या विचारातून आजच्या दिवसाचे महत्त्व उलगडून सांगतील."

✪ शिक्षक दिनाचे महत्त्व-
   "शिक्षक आपल्या आयुष्यातील खरे मार्गदर्शक असतात. डॉ. राधाकृष्णन यांनी नेहमीच सांगितले की, 'गुरु आणि शिष्य यांचे नाते हे समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांत महत्त्वाचे आहे.'
आज आपण या विचारांचा गौरव करत आहोत."

सांस्कृतिक कार्यक्रम / कविता / विद्यार्थी प्रतिनिधी मनोगत  / नृत्य-

"आता या कार्यक्रमात थोडं रंगतदार आणि भावनिक वातावरण निर्माण करणार आहोत एका छोट्या कवितेमधून / भाषणामधून / नृत्यप्रस्तावनेतून."
(कार्यक्रमानुसार नोंद घ्या आणि सुत्रसंचालनानुसार नावे घ्या.)
   "गुरुजनांविषयी विद्यार्थ्यांच्या भावना शब्दात व्यक्त करण्यासाठी, मी आता विद्यार्थी प्रतिनिधी ___ यांना मंचावर आमंत्रित करतो."

 अध्यक्ष भाषण :~
प्रभावशाली नेतृत्व, आभाळाएवढं कर्तृत्व, अशे कर्त्यवदक्ष.. कार्य कुशल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय...... यांनी आपले विचार प्रकट करावे.

 आभार प्रदर्शन-

      "कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी मेहनत घेतली. मी उपस्थित सर्वांच्या वतीने सर्व गुरुजनांचे, उपस्थित पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि कार्यक्रम संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो...!!
   आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आदरणीय.... यांना निमंत्रित करतो.

🙏❀ समारोप ❀ 🙏
"आजचा दिवस आपल्याला शिक्षकांच्या योगदानाची आठवण करून देतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

शेवटी एवढेच म्हणेन – 'गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जीवन नाही. या पवित्र दिवशी, आपण सर्वांनी आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात योग्य मार्गक्रमण करण्याचं संकल्प घेऊ या...... धन्यवाद! || जय गुरुदेव ||

No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

श्रीकृष्ण जन्माष्टमी

  उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...