Friday, August 30, 2024

मदर तेरेसा

 

❀ समाजसेविका मदर तेरेसा ❀
  
 एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू.
   मदर तेरेसा या कॅथोलिक होत्या मात्र त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं होतं. भारतासह त्यांना अनेक देशांच नागरिकत्व मिळालं होतं. १९४६ मध्ये त्यांनी गरीब, असहाय लेकांची सेवा करण्याचं प्रण घेतलं. निस्वार्थ सेवाभावाने त्यांनी १९५० मध्ये कोलकातामध्ये 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ची स्थपना केली होती.
★जन्म - २६ ऑगस्ट १९१० (स्कोपजे,मेसीडोनिया)
★स्मृती - ५ सप्टेंबर १९९७ (कोलकाता)

   भारतीय रोमन कॅथॉलिक नन मदर तेरेसा यांचा जन्म मेसीडोनिया मधील स्कोपजे येथे झाला. त्यांचे वडील अल्बेनियन हे दुकानदार आणि आई ही एका शेतकऱ्याची मुलगी होती. आईचा काटकपणा आणि वडिलांचा व्यवहारीपणा हे गुण मदर टेरेसा यांच्यात उतरले. अल्बेनियन यांचे कुटुंब छोटेच होते. त्यामुळे फार श्रीमंती नसतानाही मदर टेरेसा यांचे बालपण अगदी सुखा समाधानात गेले. धर्माने त्या ख्रिश्चन होत्या. वयाच्या १८व्या वर्षी ऐन तारुण्यात उंबरठ्यावर असताना सर्व संगपरित्याग करून त्या (जोगिन) मिशनरी बनल्या. त्यांनी एक वर्षभर इंग्रजी अभ्यास केला. ६ जानेवारी १९२९ रोजी त्या भारतात आल्या.


 कोलकत्ता येथे दाखल होऊन लॉरेटो मिशनच्या ‘सेंट मेरी हायस्कूल’ मध्ये त्यांनी भूगोल शिकवण्यास सुरुवात केली. नंतर त्या पाटणा येथे आल्या. 'अमेरिकन मेडिकल मिशन’ मध्ये त्यांनी वैद्यकिय उपचार आणि परिचारिका यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. मदर टेरेसा यांनी १९४८ साली कोलकत्ताच्या ‘मोतीझील’ या झोपडपट्टीत आपले सेवा कार्य सुरु केले. तेथे त्या रोगी, अपंग-अनाथांची प्रेमाणे सेवा करू लागल्या. अनाथ अपंग, गोर-गरीब यांच्या सेवेचे त्यांनी त्या वेळी घेतलेले खडतर व्रत शेवट पर्यंत हव्याहत चालू होते. मदर टेरेसा ख्रिश्चन मिशनरी असल्या तरी धर्म, पंथ, जात त्यांच्या जन सेवेच्या आड येत नव्हती. प्रत्येक मानवात त्यांना भगवान येशू दिसत होता. म्हणूनच जनसेवा हीच ईश सेवा आहे. असे समजूनच त्या समाज कार्य करीत होत्या. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर मग तो कोणत्याही धर्माचा असो, अपंग, गरीब, किंवा महारोगी असो, आबाल-वृद्ध स्री-पुरुष कोणीही असो त्यांच्या वर मदर टेरेसा प्रेम करीत होत्या व त्यांची सेवा करीत असत. प्रत्येकाला दिलासा, धीर, आधार, देऊन दुखीतांचे अश्रू पुसीत असत, म्हणूनच त्यांनी स्थापन केलेल्या ‘निर्मल हृद्य’ ‘शिशु भवन’ ‘महारोगी केंद्र’ या संस्था मधिल प्रत्येक व्यक्तीला मदर टेरेसा या आई प्रमाणे होत्या.

    कोलकत्ता मध्ये कालिमाता मंदिरातील धर्म शाळेत १९५२ साली त्यांनी ‘निर्मल हृद्य’ हि संस्था प्रथम उघडली. तिथे सर्व जाती धर्माचे दु:खी रोगी, वृद्ध, अपंग आश्रय घेतात. त्यांच्या या उद्दात्त कार्याच्या शाखा आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही पसरलेल्या आहेत. १९५७ साली त्यांनी ‘महारोगी सेवा केंद्र’ सुरु केले. महारोग्यांची सेवा करण्याचे जणू त्यांनी व्रतच घेतले होते. हे कार्य त्यांचे अखंड चालू होते. त्यांच्या कार्याला लोक खुशीने पैसा, धान्य, कोणी गाद्या, रजया, चादरी देत. कारण देणार्याचे मदर टेरेसा वर व त्यांच्या कार्यावर प्रेम होते. आपण दिलेल्या पैशाचा चांगलाच उपयोग होतो यावर सार्यांचाच विश्वास असायचा. मदर तेरेसा म्हणजे चालती बोलती प्रेम मूर्ती  होती. १९६२ साली भारत सरकारने यांना ‘पद्मश्री’ हि पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. हा पुरस्कार मिळविणारी पण भारतात न जन्मणारी हि पहिली महिला होय. पद्मश्री शिवाय आणखी कितीतरी बहुमान आणि पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. १९७२ साली इंदिरा गांधींच्या उपस्थितीत मदर टेरेसा यांना त्यावेळेचे राष्ट्रपती गिरी यांच्या हस्ते नेहरू पारितोषिक देण्यात आले. त्या पूर्वी १९७१ मध्ये २१,५०० डॉलर्स ‘गुड स्यमोरीटन’ हे पारीतोषिक  आणि तेविसावे पोप जॉन यांच्या नावाने देण्यात येणारे शांतता पारीतोषिक हि मदर टेरेसा यांना देण्यात आले. शिवाय त्याच वर्षी पन्नास हजार पौउंडाचे ‘जोसेफ केनेडी ज्युनिअर फौन्डेशन, पारीतोषिक ही त्यांना देण्यात आले. त्याच पारितोषिका तून कोलकत्ता विमानतळाजवळ मतीमंद मुलांसाठी शाळा सुरु झाली. १९७२ साली ‘टेपलटन फौन्डेशन ‘बक्षिसही मदर टेरेसा यांना मिळाले. पारितोषिक मिळालेले पैशातून त्या एकही रुपया स्वत: खर्च करीत नसत. तो सेवाकार्या साठीच वापरत. १९७८ मध्ये त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला. १९८० साली त्या 'भारतररत्न' झाल्या. १९९३ साली राजीव गांधी सद्भाभावना अवार्ड देण्यात आला. मदर टेरेसा पक्षीय राजकरणापासून दूर होत्या. प्रसिद्धीच्या त्यांना हाव नव्हती, तरीही त्या जगभर प्रसिद्ध झाल्या. आज ‘मदर टेरेसा’ हे नाव आणि त्यांचे कार्य माहित नाही असा माणूस कोठेही सापडणार नाही. स्वतःच्या सुखःदुख पुढे दुसरे काहीही न पाहणाऱ्या, जगात दुसऱ्यांचे दुखः हलके करण्यासाठी सतत परिश्रम करणाऱ्या मदर टेरेसा म्हणजे एक अलोकिक, थोर 'स्त्रीरत्न' आहेत.

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...