लोकमान्य टिळक भाषणे

  

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी भीमगर्जना करून इंग्रज सरकारला हादरून सोडणारे...

थोर पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी, निर्भिड वक्ता, प्रखर राष्ट्रवादी थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक   आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करूया.


    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 1

    लोकमान्य टिळक जयंती/ पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व मित्र-मैत्रिणींनो

 ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी  मिळविणारच’अशी सिंहगर्जना  करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक... हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. ध्येयवादी विचारांनी भरलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी घालवण्याचा पक्का निर्णय करणारे या मातृभुमीतले हीरे आहेत.         टिळकांकडून आपल्या सर्व  विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे  खूप आहे. आपण पण त्यांच्या  प्रमाणे खूप शिकले पाहिजे. आपल्या भारत देशावर नेहमी प्रेम केले पाहिजे.

            SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 2

अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों…. मी (नाव....) सर्वांना माझा नमस्कार !

   १८९७ मध्ये प्लेगच्या साथीची आपत्ती पुणे शहरावर कोसळली होती . त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले होते . तेव्हा निर्भयपणे टिळकांनी लोकांमध्ये राहून काम केले आणि त्यांना धीर देत राहिले . समाजजागृती तर केलीच सोबत सरकार जेथे चुकेल तिथे सडेतोडपणे टिकाही करत होते . 

   राजकीय चळवळीत जहाल आणि मवाळ असे गट पडले होते त्यात लोकमान्य टिळक हे जहाल गटाचे होते आणि त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी याच नीतीचा अवलंब करायचा होता. कलकत्ता येथे कॉग्रेसच्या अधिवेशनात मवाळांच्या धोरणास बाजूला सारून स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या लो. टिळकांच्या चतु:सुत्रीस मान्यता मिळाली.

           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

~~~~~~~~

   ⇩⇩ लोकमान्य टिळक  महत्त्वाची माहिती वाचण्यासाठी क्लिक करा  ⇩⇩  



~~~~~~~~

★लोकमान्य टिळक मराठी भाषण -3
कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन, उपस्थित सर्व मान्यवर गण आणि माझ्या  मित्र मैत्रिणींनो.! 
टिळकांचे खरे नाव केशव आहे. परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.
    आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायच असेल तर आपल्या भारतीय जनतेला, भारतीय तरुणांना जागृत केलं पाहिजे या विचारसरणीतून लोकमान्य टिळकांनी विविध उपक्रमाद्वारे लोक जागृतीचा विडा उचलला.
   लोकमान्य टिळक म्हणतात, ”गरम हवेच्या लाटांना सामोरे न जाता, कष्ट न करता, तळपायाला फोड न येता, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही.” कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. यातून लोकमान्य टिळक किती प्रयत्नवादी होते. कष्टांना महत्त्व  देणारे होते हे आपल्याला दिसून येते.
अशा या महान नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम .
जय हिंद जय महाराष्ट्र !
           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 4
आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो मी (नाव.....) आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
   लोकांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी २ जानेवारी १८८१ ला  'मराठा' हे इंग्रजी तर दोनच दिवसांनी 'केसरी' हे मराठी साप्ताहिक सुरू केले. मराठाचे संपादक टिळक होते आणि केसरीचे आगरकर होते.
लोकांना संघटित करून राजकीय चळवळ पूर्ण न्यायचे त्यांनी ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक स्वरुपातील गणेशोत्सव सुरू केला. तसेच शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दाराकरीता १८९५ मध्ये त्यांनी चळवळ सुरू केली आणि १८९६ मध्ये पहिला शिवाजी उत्सव  रायगडावर मोठ्या प्रमाणात साजरा झाला . अशा नवनव्या लोकजागृती उत्सवामुळे टिळकांची लोकप्रियता वाढली.
भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते.    
अशा या महान नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम .
जय हिंद जय महाराष्ट्र !
           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 5
व्यासपीठावरील सर्व मान्यवर
आदरणीय माझे सर्व शिक्षक, माझे प्रिय सर्व वर्गमित्र, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिवभक्त
दुष्काळ सगळीकडे असताना प्लेग हा महारोग पसरायला सुरुवात झाली .प्लेगचा महाभयंकर असा संसर्गजन्य रोग आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती अशावेळी इंग्रज सरकार भारतीय लोकांवर अन्याय जुलम करत होते.”दुष्काळ विमा निधी” यामधून इंग्रज सरकार भारतीय जनतेकडून पैसा गोळा करण्याचे काम करत होते; म्हणून या निधीचा वापर लोकांसाठी करावा असा टिळकांचा आग्रह होता. त्यांनी इंग्रजांना सडेतोडपणे उत्तरही दिले. 
   १९०० ते १९०५ या काळात टिळकांनी जे लेखन केले त्यावरुन त्यांच्या वैचारिक भुमिकेचे दर्शन घडते. कठोरपणे टिका करताना अनेक राजकीय व सामाजिक प्रश्नांवर लिहून सरकारचा खरा चेहरा दाखवत राहिले. यामुळे अप्रत्यक्षरीत्या पडद्यामागून स्वातंत्र्याचा लढा तीव्र होत गेला .

           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 6
  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. !  
भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. पुण्यात आणि मुंबईत प्लेग ची साथ पसरली होती. तिच्या वर उपाय योजनेच्या नावाखाली इंग्रजांनी लोकांवर  खूप अत्याचार केले. औषध  फवारणी च्या निमित्ताने लोकांना  घराबाहेर काढले. नासधूस केली. स्त्रियांवर अत्याचार केले. अश्या या जुलमी राजवटी विरोधात " ह्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" असा जळजळीत अग्रलेख लिहिणारे थोर नेते होते " लोकमान्य  टिळक"
      लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 साली आसमंतात  विलीन झाले. खरोखरच तो दिवस इतिहासातील एका अतिशय दुःखद असा दिवस होता. की ज्या व्यक्तिमत्त्वाने देशाला स्वाभिमान शिकवला.

           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 7
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो.! सर्वांना माझा नमस्कार..
    लोकमान्य टिळक यांचे जन्म नाव केशव तथा बाळ गंगाधर टिळक असे होते. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला.
कुठल्याही परिस्थितीला न घाबरता सामोरे जाणे हा त्यांचा स्वभावच होता. लोकमान्य टिळक हे महान व्यक्तिमत्व इंग्रजांशी कडा संघर्ष देत असताना आपल्या लेखणीच्या, आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे.
सर्व लोकांना एकत्र कसे आणायचे कसे? या कल्पनेतूनच त्यांनी शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे कार्यक्रम किंवा उत्सव सुरू केले. या उत्सवांमुळेच लोक एकत्र येऊ लागले.
   देशकार्य आणि लिखाणकाम सुरू असताना मनात स्वराज्या विषयी असणारी तळमळ कायम होती. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचं 'असे ठामपणे सांगणारे लोकमान्य टिळकच होते. 
           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    ★लोकमान्य टिळक मराठी भाषण - 8
   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो.
   लोकमान्य टिळक आपल्या वर्तमानपत्रातून इंग्रज सरकारवर कायम टीका करीत होते, म्हणूनच ब्रिटिश सरकारने त्यांना 1897 साली राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली जवळजवळ दीड वर्ष तुरुंगामध्ये ठेवले. हा राजगृहाचा खटला बरेच दिवस चालला आणि राजगृहाच्या गुन्ह्याबद्दल  त्यांना मंडले या तुरुंगात सहा वर्ष तुरुंगवास देखील भोगाव लागला.
    अखिल भारतामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम किंवा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. इंग्रजांविरुद्ध प्रचंड जनक शोक तयार करण्याचे काम कोणी केले असेल ते लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्या या विचारांमुळेच भारतातील जनता ही त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला खूप मोठा पाठिंबा देत होती. 
           SATISH BORKHADE SIR 7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂



No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...