"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

लालबहादूर शास्त्री जयंती भाषणे

 लालबहादूर शास्त्री यांचे अलौकिक कार्य भारत देशासाठी अभिमानास्पद आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो. 

~~~~~~~~

लालबहादूर शास्त्री जयंती भाषण-1

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
   लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती च्या उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

महात्मा गांधी  यांचा जन्म व शास्त्री जीचा चा जन्म एकाच तारखेला येतो.  त्यांचे विचारहि एकच होते. महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते.
  सादगी और इमानदारी,
यही है शास्त्री जी की पहचान..!
सत्ता पाकर भी नही था,
उन्हे तनिक भी अभिमान...!!
   शास्त्रींनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. 1921 मधील असहकार आंदोलन, 1930 मधील दांडी यात्रा, 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साधेपणाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री हे एक महान नेतृत्व होते. आपल्या देशाप्रती समर्पित सेवेमुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि समतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी सामान्य लोकांची भावना समजून घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचे मित्रच बनले.
अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे गृहमंत्री, वाणिज्य मंत्री, रेल्वेमंत्री म्हणून काम करताना त्यांच्या कसोटी पूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाने ते लोकप्रिय झाले.
    शास्त्रीजींनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. अशा विनयशील व्यक्तीच्या मागे त्यांचे गुरु महात्मा गांधीजींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. शास्त्रीजी नेहमी म्हणत असत की, कठोर मेहनत ही प्रार्थना समान आहे. अशा उदार मनाच्या थोर देशभक्ताने भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले.
अशा या थोर विभुतीस माझे कोटी कोटी प्रणाम!!
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत! धन्यवाद.!

~~~~~~~~

लालबहादूर शास्त्री जयंती भाषण-2
   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज दोन ऑक्टोबर, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपणास जी माहिती सांगणार आहे, ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती.
लालबहादूर शास्त्री हे थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. उत्तर प्रदेश मधील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात 02 ऑक्टोबर 1904 रोजी लालबहादूर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले.
   वयाच्या अकराव्या वर्षी गांधीजींच्या भाषणाने ते भारावून गेले. मग चंपारण्य सत्याग्रह, रोलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इ. घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. तेव्हाच त्यांनी देशसेवेला वाहून घ्यायचा निश्चय केला.
शास्त्री महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेते होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. त्यांनी 1921 मधील असहकार आंदोलन, 1930 मध्ये दांडी यात्रा व 1942 साली महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध सुरू केलेल्या “भारत छोडो आंदोलनात” सहभागी होऊन महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
    देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईत त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकुन दिले होते. यासाठी अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. भारत देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, रेल्वेमंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात दिवाण खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
~~~~~~~~

लालबहादूर शास्त्री जयंती भाषण-3

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार.! 

उत्तर प्रदेश मधील ‘मोगलसराई’ या गावी एका गरीब कुटुंबात 02 ऑक्टोबर 1904 रोजी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते.

राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला. ऐन तारुण्यात त्यांनी खूप पैसे मिळवून ऐश आरामात राहण्यापेक्षा देशसेवेला वाहून घेण्याचे ठरविले. भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेचे ते सक्रिय सभासद झाले.

भारतीय स्वातंत्र्य युद्धात शास्त्रींनी ‘मरो नाही मारो’ ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला अधिक तीव्र केली.

स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेकवेळा अटक झाली. त्यांनी यावेळी एकूण नऊ वर्षाचा कारावास भोगला.

लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते.

‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री हे एक महान नेतृत्व होते.

~~~~~~~~

लालबहादूर शास्त्री जयंती भाषण-4

सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो

लालबहादूर शास्त्री यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणामुळे शास्त्रीजी नदीच्या पाण्यात पोहून शाळेत जात असत. लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्त्वज्ञान या विषयात शास्त्री ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव म्हणून लालबहादूर शास्त्री हे भारतभर परिचित झाले.

१९६४ ला नेहरूजिंचा अंत झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. 

अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले. शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असलातरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली. 

”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.” 

~~~~~~~~

 लालबहादूर शास्त्री जयंती भाषण-5
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
   लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती च्या उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
   लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारस जवळील मोगल सराई या रेल्वे वसाहतीत झाला.
   महात्मा गांधी, लाला लजपतराय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता.
  लाल बहाद्दूर शास्त्री कॉंग्रेस चे सरचिटणीस असताना त्यांना दरमहा ६० रुपये  पगार होता , जो ते आपल्या पत्नी कडे देत आणि त्या मध्ये त्यांचा सगळा खर्च चालत असे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्या कडे आला, त्याच्या मुलाच्या शस्त्रक्रिये साठी त्याला ६० रुपये उसने पहिले होते, त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले..., शास्त्रीजी म्हणाले कि माझा पगाराच तेव्हडाच आहे, ज्या मध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जमतेम  भागतो मी तुला कुठून पैसे देऊ ? शास्त्रीजींची पत्नी हे ऐकत होती , त्या म्हणाल्या त्याची आजची गरज महत्वाची आहे , माझ्या कडे ६० रुपये आहेत आपण ते त्यांना द्या. शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले. तो मित्र गेल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला विचारले कि हे पैसे तू कुठून आणलेस ? त्या म्हणाल्या तुमच्या दर महिन्यातील पगारातून मी ५ रुपये साठवत होते त्याचे १ वर्षाचे असे साठलेले , ६० रुपये माझ्या कडे होते. 
    त्या नंतर लाल बह्हादूर शास्त्री यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि स्वतःचा पगार ५५ रुपये करण्याची विनंती केली.... त्यांनी असे लिहिले कि माझा  महिन्याचा खर्च ५५ रुपयात भागतो ...!!
   पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस संसदीय सभेने 9 जून 1964 रोजी लालबहादूर शास्त्री यांचे पंतप्रधान पदावर एकमताने नियुक्ती केली.
  11 जानेवारी 1966 रोजी या महान देशभक्ताचे हृदयविकाराने निधन झाले.
    असामान्य नेतृत्व लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द बंद करतो. 
~~~~~~~~

लालबहादूर शास्त्री जयंती भाषण-6
‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा देऊन सर्व देशवासीयांचे बळ सेनादला मागे उभे करणारे, युद्धात पाकिस्तानला खडे चारून भारताचा मान व शान जगात वाढविणारे असे स्वाभिमानी, विनयशील, कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.

◆ फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी..
◆ परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी..
◆ गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी
◆ वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी...
◆ पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी
◆ एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी...
◆ गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी
◆ पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी
◆ पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पूर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी
◆ पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी

   मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नी कडून वसूल केले.

म. गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो.

  असे साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी, यांच्या धैर्यशील निस्वार्थ देश प्रेमाला मानाचा मुजरा...!!
धन्यवाद, जय हिंद..! जय भारत..!!
         ~~~~~~~~      ~~~~~~~~
             


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...