"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

निरोप समारंभ चारोळ्या/ शायरी

 

       निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायच सुद्धा असतं...  जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायच नसत . निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात केवळ स्पर्श सांभाळायचा असतो  मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात मधुन साद मात्र आपण दयायचा नसतो प्रतिसाद . निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं , दुस-याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं .

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


सूर्याचे हृदयही पाघळते

दिवस मावळत आल्यावर..!

कठोर मनेही हळवी होतात

निरोप समारंभ जवळ आल्यावर...!!

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


 ★🎤 निरोपासाठी....


निरोपाचा क्षण जणु

हळव्या तो फुलांचा...

आठवांची जणु गर्दी

क्षण हा विरहाचा...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


नको नको वाटे निरोप

घेऊन येतो दुःखद क्षण...

पण गाठण्या ते यशोशिखर

घेऊ शपथ प्रत्येक जण...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


 निरोप दयायचा आहे कोणाला

अन् निरोप घ्यायचा कुणी...

आपण सारेच तर आहोत

या जगती निरोपाचे धनी...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

~~~~~~~~

   ⇩⇩ निरोप समारंभ प्रभाव पूर्ण सूत्रसंचालन साठी क्लिक करा ⇩⇩  

~~~~~~~~

कोणताही माणूस आपल्या.  कार्यकौशल्यावर आपले जीवन घडवत असतो जीवनात आलेल्या प्रत्येक सवालाचा जबाब शोधत असतो जबाब छान दिले तर तो लाजबाब होत असतो असे आमचे लाडके मुख्याध्यापक श्री ........ यांच्यासाठी

आप जैसे भी हो हमारे दिल मे हो...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या आठवणी देऊन जाईन…

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप द्यावा निरोप घ्यावा

परी न क्लेश मनी ठेवाल

आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा

स्मितवदन जरुर कराल...😊

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


काही नाती तुटत नाहीत

ती आपल्या नकळत मिटून जातात...!

जशी बोटांवर रंग ठेवून..

फुलपाखरंहातातून सुटून जातात...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


  ★मी पाहिलं तुम्हाला...

आर्दशाचा गाङा हाकताना......

..स्वाभिमानानं जगताना....

प्रेमाने पाठीवर हात फिरवताना....

संस्काराच्या वेळी रागावताना

संकटात वादळ थोपवताना

......सरांना/....... मॅङमला मी पाहिले

सदैव आशिर्वाद देताना....

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


🎤🎤निरोप समारंभासाठी उपयूक्त चारोळ्या ...📝📝


निरोप घेता तुमचा

ह्दय दाटले ।

स्नेह बंध  आपूलकिचे

मनात  साठले  ।।▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


हे बंध रेषमी प्रेमाचे

आपल्या गोड नात्याचे ।

ठेवा आठवण आमुची

हे बंध  विश्वासाचे ।।

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप द्यावया आपुला

मन होई हे जड ।

हे गुरू शिष्याचे नाते

शाश्वत राहो अखंड गोड ।।

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


कधीकाळी जर दुखावली

आम्ही आपली  अंतरे ।

सोडून द्यावे राग ,द्वेश

माफ करावे बरे ।।

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


घ्यावी उंच झेप गगणी

आपण यश किर्तीची ।

शोभा वाढवावी

या ज्ञानमंदिराची ।।

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोपाचे क्षण हे आले,

पापण्या ओलावून गेले,

आठवणींच्या हिंदोळ्यावर,

मन हे वेडे स्वैर झाले।


शाळेचा निरोप घेताना,

वळून शेवटी पाहताना |

स्मृती दाटल्या मनात,

पाणी डबडबल्या डोळ्यात|

▂▂▂▂▂▂▂▂▂▂

   ★ निरोपाची चारोळी.

निरोपाचा क्षण हा...         

किती समीप आला... 

निरोप कसा देऊ तुम्हा...   

कंठ दाटून आला...   

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

    डोळ्यात आसू अन्..   

    ओठात हसू ठेऊन...     

    शुभेच्छा देते तुम्हाला ...

    मुलांनो, स्नेहमय शुभेच्छा तुम्हाला..

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

निरोपाचा क्षण जणु

हळव्या तो फुलांचा.,.

आठवांची जणु गर्दी

क्षण हा विरहाचा>>>

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

नको नको वाटे निरोप

घेऊन येतो दुःखद क्षण

पण करण्या ती प्रगती

घेऊ शपथ प्रत्येक जण...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

निरामय,आरोग्यदायी, निखळ आयुष्य जगा ही सदिच्छा...

निवृत्ती नंतरच्या जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा...!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा.

नातीच्या सुरांमध्ये सूर तुमचा जुळावा.

राहून गेले मनात की जे करायचे होते,

वेळेच्या आभावी ते ते जमत नव्हते.

सर्व त्या इच्छा पूर्ण आता करा

जीवनाचा कलश आनंदाने भरा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


शाळेच्या आठवणींनी कधी मन भरून येईल,

नातीच्या बोबड्या बोलात विरघळून जाईल.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


असं नाही म्हणत आम्हाला पूर्ण विसरून जा,

काही क्षण तुमचे शाळेसाठीही द्या.

पूर्ण होवोत तुमच्या मनातल्या इच्छा!

पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप हा निरोप नसतोच

तर ती असते गोड आठवण..

आयुष्याच्या  वाटचालीत

असते प्रेमाची साठवण...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


तुमचा  निरोप  घेताना

वळून  शेवटचे  पाहताना

स्मृती  दाटल्या मनात

पाणी डबडबले डोळ्यांत

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या आठवणी देऊन जाईन…

आज घेऊया निरोप आपण

विरह दाटतो उरी

असू द्या प्रेमच सर्वावरी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप द्यावा निरोप घ्यावा

परी न क्लेश मनी ठेवाल

आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा

स्मितवदन जरुर कराल😊

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 निरोपाच्या हळव्या क्षणी

दाटून येती आठवणी

डोळ्यात साठते पाणी

मूक होते वाणी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासू अन् दुस-यात आसू

नितळ नितांत आठवणींत मग दुखःत कसे बसू

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


आठवणी तर दिल्यात भरपूर

पुरून उरतील त्या आयुष्यभर

एकटेपणात येईल  आठवांचा पूर

डोळ्यात आसवांची लागेल धार

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोपाचे क्षण

साठवून हृदयी ठेवू

मखमली मोरपिस

मनी जपून ठेवू

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


आठवणींचा गुलकंद

देईल मना आनंद...!

गतकाळच्या स्मृतीमधे

बागडू आम्ही स्वच्छंद...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप नव्हे हा

ओलावा माणुसकीचा...!

विसरू कसा मी

क्षण हा सौख्याचा...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


आपल्या ऋणात

सदैव राहीन मी...

मनाच्या कप्प्यात 

तुम्हा साठवीन मी...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


सूर्याचे हृदयही पाघळते

दिवस मावळत आल्यावर

कठोर मनेही हळवी होतात

निरोप समारंभ जवळ आल्यावर...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

      ◆ निवृत्तीसमारोह-

ज्ञान,संस्काराचा तुम्ही दिला वसा

आम्ही चालवु हा पुढे वारसा


सा-या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य

असे लाभावे  उदंड आयुष्य


निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आस्था

जिथे भेटाल तिथे ठेऊ चरणावरती माथा

होऊ दया पुर्ण मनातील सर्व इच्छा आकांक्षा...!

ह्याच सेवानिवृत्ती सोहळयानिमित्त शुभेच्छा...!!

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

दृष्ट लागण्या जोगे सारे काम केले ज्यांनी आजवर ...!

निरोप त्यांना देणे आहे दगड ठेवला आज मनावर....!!

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  ★ समारोप चारोळी....


सोडू म्हणता सुटत नाहीत,

विसरु म्हणता विसरत नाहीत,

काही प्रसंग, काही व्यक्ति,

काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.

आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात.


आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.

अशाच होतात गाठीभेटी,

डोळे ओले होण्यासाठी...!

चार दिवस सोबत राहून,

पुन्हा दूर जाण्यासाठी...!!

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


ही आदर्शाची माती,

इथे संस्काराचा ओलावा।

पिकलेल्या पानामधून,

नित्य मधुमास बहरावा।।

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


 निरोपाचे क्षण हे आले,

पापण्या ओलावून गेले...

आठवणींच्या हिंदोळ्यावर,

मन हे वेडे स्वैर झाले...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप हा निरोप नसतोच

तर ती असते गोड आठवण..!

आयुष्याच्या  वाटचालीत

असते प्रेमाची साठवण...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


तुमचा  निरोप  घेताना

वळून  शेवटचे  पाहताना

स्मृती  दाटल्या मनात

पाणी डबडबले डोळ्यांत

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


   ■ निरोप समारंभ प्रसंगी ■

खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या आठवणी देऊन जाईन…

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

आज घेऊया निरोप आपण

विरह दाटतो उरी असू द्या

प्रेमच सर्वावरी

निरोप द्यावा निरोप घ्यावा

परी न क्लेश मनी ठेवाल...

आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा

स्मितवदन जरुर कराल...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


 निरोपाच्या हळव्या क्षणी

दाटून येती आठवणी...!

डोळ्यात साठते पाणी

मूक होते वाणी...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासू 

अन् दुस-यात आसू...!

नितळ नितांत आठवणींत 

मग दुखःत कसे बसू...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप हा निरोप नसतोच

तर ती असते गोड आठवण..

आयुष्याच्या  वाटचालीत

असते प्रेमाची साठवण...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


आठवणी तर दिल्यात भरपूर

पुरून उरतील त्या आयुष्यभर..

एकटेपणात येईल आठवांचा पूर

डोळ्यात आसवांची लागेल धार...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोपाचे क्षण

साठवून हृदयी ठेवू...

मखमली मोरपिस

मनी जपून ठेवू...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


आठवणींचा गुलकंद

देईल मना आनंद

गतकाळच्या स्मृतीमधे

बागडू आम्ही स्वच्छंद

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


निरोप नव्हे हा

ओलावा माणुसकीचा...

विसरू कसा मी

क्षण हा सौख्याचा...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


आपल्या ऋणात

सदैव राहीन मी...

मनाच्या कप्प्यात

तुम्हा साठवीन मी...!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...