"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Thursday, October 10, 2024

रतन नवल टाटा

 

देव माणूस हारपला...!!

   शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढे आहे रतनजी टाटा या व्यक्तीचे देशासाठी योगदान...!

   अमाप पैसा असतांनाही संयम माणुसकी कशी असावी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे रतनजी टाटा... खरे देशभक्त..!!

खरा देशभक्त नि त्यागी

असा दुसरा होणे नाही..!

आकाशाचे पंख लावूनी

पाय जमिनीवर राही...!!

भारताचा रतन नव्हे 

तू आहेस भारतरत्न...!!

   संपत्तीचा उपयोग कसा करावा हे रतनजी टाटाकडून शिकण्या सारखे होते. भारतीय उदयोग जगतांचे शिल्पकार रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली...!!

अलविदा देश के "रतन... 

याद करेगा "वतन...!!

~~~~~~~~

 ★ रतन नवल टाटा ★

◆जन्म - २८ डिसेंबर, १९३७ 
◆मृत्यू - ९ ऑक्टोबर, २०२४

    हे   एक भारतीय  उद्योगपती  आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

    निळ्या समुद्राबरोबरच त्यांना निळ्या आकाशाकडे तासन्‌तास पाहण्यात मौज वाटे किनाऱ्यावर भराऱ्या घेणारे सिंगल पक्षी पाहीले की आपल्यालाही या पक्षांप्रमाणे आकाशात भरारी मारता येईल का ? विमानात बसून कापसाच्या गाठीसारख्या ढगापलीकउचा चंद्र आपल्याला पाहता येईल का ? असे प्रश्न त्यांना पडायचे. पक्ष्यांप्रमाणे आपल्याला अवकाशात झेपावता येईल का ? असे स्वप्न उराशी बाळगून त्यांचे शिक्षण सुरु झाले.शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड होती. तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी एस्सी  झाल्यानंतर त्यांनी मुद्रास ऑफ टेक्‌नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला, प्रवेशासाठी लागणारे पैसेही नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन डॉ. कलामांना पैसे दिले. या संस्थेतून त्यांनी एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. 

     पुढे अमेरिकेतील नासा या संस्थेत एरोस्पेस टेक्नॉ लॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळात चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या कलाम याना अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्म‌सात केले त्यानंतर त्यांचा १९५८ ते १० या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी अर्थात  DRDO शी संबंध आला.

~~~~~~~~

★अनमोल रत्न रतनजी टाटा★
●र*  त्न जे  अखिल विश्वाचे,
    सौभाग्य होते भारताचे ।
●त*  न, मन, धन अर्पिले,
 इच्छा...कल्याण व्हावे सार्‍यांचे ।।
●न*  वनवीन संकल्पना प्रत्येकाकडे, फक्त साकाराव्यात त्या कृतीने ।
●जी*  वन साधे तरी मौलिक,
  दाविले जगी टाटांनी कर्तृत्त्वाने ।।
●टा*  र्गेट ठेवून जिद्दीने उतरा,
  म्हणती...विश्वासाने व्यवसायात ।
●टा*  टा,अल्विदा म्हणू जरी आज, कायम स्थान राहिल मनामनांत ।।
🌻 *भावपूर्ण श्रद्धांजली*🌻

~~~~~~~~

   टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! 

   मुळात इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले जमशेदपूर आणि तिथले टाटा घराण्याचे योगदान बालवयापासूनच आपल्या सर्वांवर ठळक बिंबले आहे. टाटा घराण्याने भारतीय औदयोगिक संरचनेचा मजबूत पाया रचला. स्वातंत्र्य चळवळीस पूरक अशी आर्थिक भूमिका त्यांनी वठवली. त्यामुळे पूर्वापार टाटा या नावाविषयी भारतीय मनात एक आस्था आहे! टाटांचा ट्रक असेल वा अगदी महागडी जॅग्वारची कार असेल नाहीतर छोटा हत्ती नावाचं कनिष्ठवर्गीयांच्या पोटाचं साधन असेल भारतीय माणूस त्यांना आपलं मानत आलाय! टाटा सुमोची, सफारीची क्रेज अफाट होती. वाहन क्षेत्रात त्यांची भरारी उत्तुंग होती, सामान्य माणसाच्या आवाक्यात चारचाकी यावी म्हणून केवळ लाखाची कार बाजारात आणली!

     टाटांनी कधी आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन केले नाही या गोष्टीचा बराच प्रभाव पडला. सामान्य माणसांच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांचा वावर अत्यंत सुखद नि अनुकरणीय असायचा. त्यामुळे लोकांना हा माणूस आपला वाटायचा!
'हे अफाट श्रीमंत आहेत पण आपल्यासारखेच साधे आहेत!" ही भावना या व्यक्तीला अत्यंत उच्चस्थानी घेऊन गेली! आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचं त्यांचं वर्तन नेहमी चर्चेचा विषय राहिलंय, 'धिस पर्सन इज डाऊन टू अर्थ' याचा दाखला देण्यासाठी त्यांच्यासारखा माणूस नव्हता.

   टाटा म्हणजे विश्वास हे आपल्याकडे रुळले कारण त्यांच्या उत्पादनाच्या दर्जाची, गुणवत्तेची खात्री! पिढी दर पिढी याला कधी तडा गेला नाही त्यामुळे लोकांनी त्यांच्या उत्पादनावर भरवसा ठेवताना मागेपुढे पाहिले नाही. कळत नकळत भारतीय माणूस कोणत्या ना कोणत्या उत्पादनामुळे या समूहाशी जोडला गेला. टाटांनी बाजारात आणलंय म्हणजे चांगलंच असणार असं लोक नेहमी मानत राहिले. गरीबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गवारीचे लोक त्यांच्याशी जोडले गेले. खरेतर हा एक पूल होता जो अनेक विषम आर्थिक वर्गवारीतल्या लोकांना एकाच अदृश्य मंचावर जोडायचा! लोकांना याचं एक छुपं आकर्षण असण्यामागचं हे एक महत्वाचं कारण होय!

    'कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत लोकांच्या खिशावर हात साफ करण्याची नियत ही त्यांनी ठेवली नाही. सारं काही ओरबाडून खाण्यासाठी देशाची धोरणे आपल्याला अनुकूल करण्यासाठी त्यांनी कसरती केल्याचे वा आर्थिक हेराफेरी केल्याचेही कधी ऐकिवात नाही!

   दारिद्र्यरेषे खालील माणसापासून ते उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत भारतात एक गृहीतक प्रचलित आहे ते म्हणजे कष्ट, सचोटी, विश्वास, जिद्द यांना मेहनतीची जोड लाभली की माणूस यशस्वी होतोच! सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या टाटांनाही हे ठाऊक असावे म्हणून त्यांनी वाममार्ग कधी निवडले नसावेत त्यामुळे सामान्य भारतीय माणसांना हा इसम जबर वंदनीय होता!

~~~~~~~~

★ सन्मान आणि पुरस्कार ★
    राष्ट्रपती भवनात रतन टाटा यांना पद्मविभूषण प्रदान करताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील (२००८)
रतन टाटा यांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण, भारत सरकारचा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. टाटा यांना २००६ मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या कामासाठी ' महाराष्ट्र भूषण ' आणि आसाममध्ये  कर्करोगाच्या उपचारात योगदान दिल्याबद्दल २०२१ मध्ये ' आसाम वैभव ' असे विविध राज्य नागरी सन्मानही मिळाले आहेत. 

    ममत्वाने भारलेला एक थकलेला वृद्ध वटवृक्ष, ज्याची मृदू देहबोली नि सात्विक तेज पाहता क्षणी थकवा दूर करे असं रतन टाटांचं वर्णन करता येईल. कुणाचं निधन होताच आपल्याच घरातलं कुणीतरी गेल्याचं फील आजकाल येत नाही मात्र रतन टाटा याला अपवाद आहेत!
    निव्वळ बोथट बधीर कालखंडात आपण सारेच जगत आहोत नि एका उत्तुंग उद्योगपतीच्या निधनाने अवघा देश शोकविव्हळ झालाय ही रतन टाटांची कमाई आताच्या अन्य कोणत्याही औद्योगिक घराण्यातील व्यक्तीस मिळेल याची सुतराम शक्यता नाही!

   'सारी सोंगे आणता येतात मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही' अशा अर्थाची म्हण आहे, त्यात वाढ करून असंही म्हणता येईल की कैक श्रीमंत होतील मात्र रतन टाटा कुणाला होता येणार नाही! 
कारण हा माणूस अफाट श्रीमंत होता एव्हढीच यांची ओळख नव्हती! एकशेचाळीस कोटी लोकांच्या हृदयात  त्यांना स्थान होते, ते इतरांना कसे लाभेल!
~~~~~~~~

★ "तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही"…. रतन टाटा...!!

    २६/११ च्या घटनेनंतर काही महिन्यांनी टाटा उद्योग समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी
त्यांच्या देश विदेशातील हॉटेल्सचे नुतनीकरण व पुनर्रचना करण्याच्या कामाचे त्यांचे सर्वात मोठे टेंडर काढले. काही पाकिस्तानी कंपन्यांनी हे  टेंडर भरले होते. आपले टेंडर प्रभावशाली ठरावे म्हणून पाकिस्तानातील दोन मोठ्या
उद्योगपतींनी रतन टाटा भेटीसाठी पूर्व नियोजित वेळ देत नाहीत हे पाहून मुंबईतील "बॉम्बे हाऊस" या टाटाच्या मुख्यालयास समक्ष भेट दिली.
त्या पाकिस्तानी उद्योगपतींना बॉम्बे हाऊसच्या स्वागत कक्षात ताटकळत ठेवण्यात आले. काही तासांनी त्यांना कळविण्यात आले की, रतन टाटा कामात व्यस्त असल्याने पूर्व परवानगीशिवाय ते कोणालाही भेटत
नाहीत.
    निराश, त्रस्त,वैतागलेले पाकिस्तानी उद्योगपती दिल्लीला गेले. आणि त्यांच्या हायकमिशन मार्फत केंद्रीय व्यापार मंत्र्याला भेटले. या मंत्र्याने लगेच रतन टाटा यांना फोन करून विनंती केली की, त्या दोन पाकिस्तानी उद्योगपतींना आपण भेट द्यावी आणि त्यांच्या टेंडरचा आस्थापूर्वक विचार करावा.
  त्यावर रतन टाटा ताडकन म्हणाले, "तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही".
त्यानंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी
सरकारने टाटा उद्योग समूहाला "टाटा सुमो" या वाहनाची खूप मोठी खरेदीची ऑर्डर दिली, मात्र रतन टाटा यांनी ती खरेदीची ऑर्डर स्पष्टपणे धुडकावून लावली …।
     पैसा, उद्योग, आणि व्यवसाय यापेक्षा रतन टाटा यांनी देशाला सर्वोच्च महत्व दिले … प्रखर राष्ट्रवाद, मातृभूमीविषयी नितांत आदर आणि देशाविषयी निस्सीम प्रेम या रतन टाटांच्या गुण वैशिष्ठ्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगून येते ….
रतन टाटांना सलाम !!!
(फेसबुकवरील कुंतल चक्रवर्ती यांच्या इंग्रजी पोस्टचे भाषांतर)
महान उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली....
💐💐💐💐💐💐
🚩♥️🚩
लाखो कोटीची संपत्ती असलेले स्वं.श्री.रतन टाटा निघुन गेले..
  मग आपल्या 5-25 एकराच्या अहंकाराची अगरबत्ती लावता कुठे ?
।।जय श्रीराम।।

 ◆देव माणूस हारपला...!!
   शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढे आहे रतनजी टाटा
या व्यक्तीचे देशासाठी योगदान...!

  अमाप पैसा असतांनाही संयम माणुसकी कशी असावी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे
रतनजी टाटा... खरे देशभक्त संपत्तीचा उपयोग 
कसा करावा हे रतनजी टाटाकडून शिकण्या सारखे होते. भारतीय उदयोग जगतांचे शिल्पकार रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली...!!
🚩♥️🚩

🚩♥️🚩

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

राष्ट्रीय शिक्षण दिन

  ११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  मौलाना अबुल कलाम आझाद     यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्री...