शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही आई इतकं आपल्यासाठी कुणीच झटत नाही... स्वतः ला झिजवून मात्र आपल्या लेकरांचं आयुष्य उजळवते ती म्हणजे आई..!! ❤️
मदर्स डे..
"आई" या शब्दाची किती मोठी व्याप्ती आहे, 'आईचं असणं' म्हणजे आपण अजूनही लहान आहोत, ही जाणीव असते. आपल्या यश अपयशाची तीच फक्त सोबत असते. प्रत्येक आई सेम असते. तरीही माझ्या आईसारखे दुसरे कोणीच नाही, ही भावना ह्या एकाच नात्यात प्रत्येकाची असतेच.
जगात फक्त ही एकच वेदना अशी असेल की, त्याच्या मोबदल्यात निस्वार्थ प्रेम मिळतं जन्माला आलेल्याला, आणि परमोच्च आनंद मिळतो जन्म देणारीला!असं हे नातं...
आपण स्वतःला समजण्या, ओळखण्याआधी नऊ महिने ती आपल्याला जाणत असते, अनुभवत असते. आपल्याला आयुष्य देतानाही तिला वेदनाच...
ती "आई"असते...आई आईचं असते...!!
आईचा कुठलाच दिवस नसतो तर आईमुळेच प्रत्येक दिवस असतो..!! व्यापता न येणारे अस्तित्व व मापता न येणारे प्रेम म्हणजेच आई...!!
देवाचे मूर्त रूप म्हणजेच आई. तिच्या मातृत्वास शतशः नमन...!!
आपल्या जन्माअगोदरपासून ची प्रत्येक गरज, भावना, दुःख, आजारपण ती कशी समजून घेत होती ..लहानपणीचे बोबडे बोल तिला कळत असतील का, हा विचारही आपल्या मनात येत नाही .
"आई" या शब्दाला कुठल्याही मर्यादा नसतात. भेदभाव नसतो, तिथे गरीब -श्रीमंत, अशिक्षित- सुशिक्षित,जात, धर्म या पलीकडेही जे नातं दृढ असतं .आई म्हणजे आईच असते ना!
कोणतीही "आई" आजारी पडते...अगदी मरणापर्यंत विचार येतात तिच्या मनात.. मुलांच कसं होईल, ह्या एकाच भावनेतून ती स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करत असते.
घरात पाऊल टाकताना समोर आई असेल तर तिचा पहिला प्रश्न," जेवण झालं का, काही खाल्लं का ? भूक फक्त आईला कळते. वेदनाही तिलाच कळते. म्हणुनच,
आई म्हणजे आईच असते..
तिच्यासारखं कोणीच नसते...!
आईबद्दल कितीही लिहिले तरी शब्द संपतील पण तिचं समर्पण संपत नाही..
आई ह्या शब्दामध्येच फार मोठाले दोन शब्द लपलेले आहेत. ''आ'' म्हणजे आकाश आणि ''ई'' म्हणजे ईश्वर.
आई हा शब्द किती गोड आहे. मीठ नावाच्या खारट पदार्थाशी जरी जोडला तरी मिठाई शब्द तयार होतो.
No comments:
Post a Comment