गुरु हा सुखाचा सागर

 गुरु हा संतकुळीचा राजा ।

गुरु हा प्राणविसावा माझा ।

गुरुवीणा देव दुजा ।

पाहतां नाहीं त्रिलोकीं ॥१॥


गुरु हा सुखाचा सागर ।

गुरु हा प्रेमाचा आगर ।

गुरु हा धैर्याचा डोंगर ।

कदाकाळी डळमळीना ॥२॥


गुरु वैराग्याचें मुळ । 

गुरु हा परब्रह्म केवळ ।

गुरु सोडवी तात्काळ ।

गांठ लिंगदेहाची ॥३॥

 

गुरु हा साधकांशीं साह्य । 

गुरु हा भक्तांलागीं माय । 

गुरु हा कामधेनु गाय ।

भक्तांघरीं दुभतसे ॥४॥


गुरु घाली ज्ञानांजन ।

गुरु दाखवी निज धन ।

गुरु सौभाग्य देऊन ।

साधुबोध नांदवी ॥५॥


गुरु मुक्तीचे मंडन । 

गुरु दुष्टांचें दंडन ।

गुरु पापाचें खंडन ।

नानापरी वारितसे ॥६॥


काया काशी गुरु उपदेशी ।

तारक मंत्र दिला आम्हांसी ।

बापरखुमादेविवरासी ।

ध्यान मनासीं लागलें ॥७॥


गुरूपौर्णिमेच्या हार्दिक   शुभेच्छा व प्रणाम 

🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...