व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय माझे सर्व शिक्षक, माझे प्रिय सर्व वर्गमित्र, दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
आपला देश जेव्हा स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनला तेव्हाच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे राजपथ येथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारताच्या इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित केला जातो.
स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांना श्रद्धांजली म्हणून, प्रजासत्ताक दिनी राजपथावर औपचारिक परेड होतात.
राजपथवर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर उच्च सरकारी अधिकारी अशा विविध मान्यवरांची उपस्थिती असते.
पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून इतर देशाच्या राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
२६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे.
No comments:
Post a Comment