Wednesday, August 28, 2024

मेजर ध्यानचंद सिंग

  राष्ट्रीय खेल दिवस  
★ भारतीय हॉकीचे जादुगर ★ 
     🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २९ ऑगस्ट १९०५
●मृत्यू :~  ३ डिसेंबर १९७९
  मेजर ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांना हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आजही ओळखलं जातं.त्यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रात खूप मोठं योगदान दिल आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी ,त्याला प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी या साठी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. 
  
     ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले.

    ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुध्दा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.
  ◆ अविस्मरणीय क्षण ◆
   १९३६ ऑलंम्पिक फायनल भारतीय टीम चे मैनेजर पंकज गुप्ता यांनी खेळाडुंचे कसब पनाला लावण्यासाठी...
    खेळाडुंना ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन गेले. त्यांनी तिरंगा झेंण्डा खेळाडुंच्या समोर ठेवला आणि म्हणाले "कि इसकी लाज अब तुम्हारे हाथ है।"
सर्व खेळाडुंनी श्रद्धापूर्वक तिरंग्याला सलाम केला आणि वीर सैनिका प्रमाने मैदान मध्ये उतरले. भारतीय खेळाडुं सुंदर खेळले आणि जर्मन  टीमला 8-1 गोल ने हरविले. त्या दिवशी खरोखर तिरंग्याची लाज राखल्या गेली.
त्या वेळेस कोणी कल्पना सुध्दा केली नाही की 15 अॉगस्ट लाच  भारताचा स्वतन्त्रता दिवस राहिल...!!

          ◆ सम्मान ◆
     मेजर ध्यानचंद यांना १९५६ मध्ये भारताचा प्रतिष्ठित नागरिक सम्मान पद्मभूषण देऊन सम्मानित केले.
      यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 इलाहाबाद, संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत मध्ये झाला. यांचा जन्मदिवसहा  भारताचा *राष्ट्रीय खेल दिवस* म्हणून घोषित केला आहे.
       याच दिवशी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करणारे खेळाडुंना राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जाते. भारतीय ओलम्पिक संघाने ध्यानचंद यांना *शताब्दी खेळाडु* घोषित केले होते.


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...