"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Thursday, October 3, 2024

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान

 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी...

~~~~~~~~

3 ऑक्टोंब मराठी अभिजात भाषा गौरव दिन...

मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा...

मिळाली महाराष्ट्राला नवीन ऊर्जा...!!

आहेच दर्जेदार भाषा मराठी

घडविले तिने थोर महात्मे, संत, गुणवंत, विचारवंत...

वाटतो आम्हा तिचा अभिमान, वाढवा आता पुन्हा तिची शान, वाढेल आणखी तिचा मान..!!

बोलू मराठी, लिहू मराठी, गाऊ मराठी ,काहीही तिच्या साठी,

आहे आम्हा अभिमान...!!

भागेल भूक, तहान, वाढेल जगात तिची शान..!!


    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला 3 ऑक्टोंबर 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला, 

~~~~~~~~


★मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला >>>

   महाराष्ट्रातील १२ कोटी मराठी भाषिकांचे स्वप्न पूर्ण झाले विविध सामाजिक सांस्कृतिक लेखक कवी साहित्यकार यांच्या लढयांना यश मिळाले. व अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्र व राज्य सरकार यांचे जाहीर आभार.

   माय मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी प्रेमीजनांचे खूप खूप अभिनंदन...!!

          🌹💐🌹💐🌹

  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काही महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात:-


1. सांस्कृतिक गौरव:- मराठी भाषेची सांस्कृतिक आणि साहित्यिक श्रेष्ठता प्रमुखतेने राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाईल, ज्यामुळे मराठी भाषिकांच्या गौरवात वाढ होईल.


2. शैक्षणिक व रोजगाराच्या संधी:- मराठी भाषेच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल. विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अभ्यासक्रमांना चालना मिळू शकते, ज्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.


3. आर्थिक अनुदान:- केंद्र सरकारकडून मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्राला भरीव अनुदान मिळू शकते. यामुळे भाषेच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी विविध कार्यक्रमांना निधी मिळेल.


4. भाषिक संशोधन:- अभिजात दर्जामुळे मराठी भाषेवरील संशोधन, जुन्या ग्रंथांचे जतन, आणि नवीन साहित्य निर्मितीला चे प्रोत्साहन मिळेल.


5. माध्यमांचा विकास:- मराठी माध्यमांचा विकास होऊ शकतो, जसे की टीव्ही चॅनेल, रेडिओ, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांमध्ये मराठी सामग्रीची वाढ होईल.


6. सांस्कृतिक कार्यक्रम:- मराठी भाषेच्या माध्यमातून होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलने, आणि नाट्य महोत्सवांना प्रोत्साहन मिळेल.


7. भाषिक स्वाभिमान:- या दर्जामुळे मराठी भाषिकांमध्ये भाषेबद्दलचा स्वाभिमान वाढेल, ज्यामुळे भाषेचा वापर अधिक प्रमाणात आणि गुणवत्तेने होईल.


8. भाषा संरक्षण:- अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि तिच्या प्राचीन वारशाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न वाढतील.

     हे सर्व परिणाम मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तिच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक महत्त्वाला प्रोत्साहन देणारे ठरू शकतात.

~~~~~~~~

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

राष्ट्रीय शिक्षण दिन

  ११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  मौलाना अबुल कलाम आझाद     यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्री...