"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Thursday, March 7, 2024

 

कैलासराणा शिवचंद्र मौळी

फणीन्द्र माथा मुकुटी झळाळी

कारुण्य सिंधू भव दुख:हारी

तुजविण शंभो मज कोण तारी !!

शिव शंकराची शक्ती, 

शिव शंकराची भक्ती,

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,

हीच शंकराकडे प्रार्थना…!!

महाशिवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!

   माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते.

 देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो....

     काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शिवशंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचविले. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भुलोकाचा विनाश टाळण्यासाठी भाविकांनी प्रार्थना केली तो दिवस म्हणजे महाशिवरात्री..


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मी देव पाहीला

       एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. ...