Monday, November 11, 2024

National Education Day

  राष्ट्रीय शिक्षण दिन.. 

११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री 

मौलाना अबुल कलाम आझाद


    यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात. 

    शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात. मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांनी दिनांक १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ या काळात शिक्षणमंत्री म्हणून देशाची सेवा केली. त्यांचा सन्मान करीत सन २००८ पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. 

   देशात IIT, IISc आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. AICTE आणि UGC सारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते प्रमुख व्यक्ती होते. विनामूल्य प्राथमिक शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची स्थापना केली. ललित कला अकॅडमी, साहित्य अकादमी आणि अश्या बर्‍याच शैक्षणिक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. व्यवसायिक प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिला.

No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

श्रीकृष्ण जन्माष्टमी

  उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...