थेऊरचा चिंतामणी

 अष्टविनायकातील पाचवा गणपती

  चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी पाचवे आहे. थेऊर गावात भीमा, मुळा आणि मुठा या तीन नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे. या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते, असा विश्वास आहे. 

★आख्यायिका-

   या मंदिराशी संबंधित अशी आख्यायिका देखील आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती.

    प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा होता. त्यांच्या पत्नीचे नाव गुणवती होते. राजाला मूलबाळ नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषींच्या आज्ञेवरून राजा-राणींनी वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे गुणवंतीला मुलगा झाला. त्याचे नाव गणासूर असे ठेवले. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींकडे चिंतामणी हा मणी होता. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वान्नाचे जेवण खाऊ घातले. गणासुराला ते रत्न हवे होते, पण कपिल मुनींनी ते देण्यास नकार दिला. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले. त्यांनी देवीला सर्व हकीकत सांगितली आणि देवीने ऋषींना गणपतीची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. श्रीगणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले. श्रीगणेशाने गणासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले.  ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेंव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती “चिंतामणी विनायक” म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेही म्हणतात.

    गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.


★इतिहास-

      चिंतामणी गणेश हे पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव पेशवे हे याच मंदिरात त्यांच्या अखेरच्या दिवसांत  वास्तव्यास होते आणि त्यांनी त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले. त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.


   गणपतीचे मंदिरश्रीमोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्रीमोरया यांचे नातू श्रीधरणीधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रुपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.


 ★मंदिर -

   श्री. चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.


 ★भौगोलिक -

   मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे.

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...