गिरिजात्मज लेण्याद्रीचा

 

सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मज

    लेण्याद्री गावात गिरिजात्मज अष्टविनायक मंदिर आहे, म्हणजे गिरिजाचा आत्मज म्हणजेच माता पार्वतीचा पुत्र म्हणजेच श्रीगणेश होय. हे मंदिर पुणे-नाशिक महामार्गावर पुण्यापासून ९० किमी अंतरावर आहे. लेण्याद्री पर्वतावरील बौद्ध लेण्यांच्या जागेवर हे देऊळ बांधले आहे. या पर्वतावर 18 बौद्ध लेणी आहेत, त्यापैकी 8 व्या लेणीमध्ये गिरजात्मज विनायक मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. 

   लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे.लेण्याद्री स्थान अष्टविनायक पैकि एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपती साठी प्रसिद्ध आहे.

★परिचय -

    गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. 

★आख्ययिका -

     गजानन हाच पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत 12 वर्षे तप केले. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला वचन दिले की मी तुझा पुत्र होईन आणि तुझ्या इच्छा आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. पार्वतीने भाद्रपद चतुर्थीला गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. मूर्ती जिवंत झाली आणि पार्वतीपुढे पुत्ररूपात प्रकट झाली. गजाननाला सहा हात, तीन डोळे आणि सुंदर शरीर होते.


   गिरिजात्मज गणेशाने या परिसरात 12 वर्षे तपश्चर्या केली. अगदी लहान वयातच त्याने राक्षसांचा वध करून सर्वांना अत्याचारातून मुक्त केले. या परिसरात गौतममुनींनी गणेशाची पूजा केली. या प्रदेशात श्रीगणेशाने ‘मयुरेश्वर’ अवतार घेतला असे म्हणतात. या परिसरात गिरिजात्मज गणेशाचे वास्तव्य सुमारे 15 वर्षे होते. त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो.


   महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. नंतरच्या काळात म्हणजे १७ व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत.

    जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे "लेण्याद्री बुद्ध लेणीं". येथीलविहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे २० निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जीना आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो. 

   मध्ययुगातील १७ व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला तिथे “गिरिजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने प्रसिद्ध आहे . 

     या लेणींचे मूळ नाव "कपिचित बुद्ध लेणीं" असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पाली भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच "जेथे वानर एकत्रित राहतात" किंवा "वानरांना आवडणारी जागा" म्हणजे कपिचित!


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...