विघ्नेश्वर ओझरचा

 सातवा गणपती – ओझरचा विघ्नेश्वर 

★ओझरचा विघ्नेश्वर-

    विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.

   अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे...

★आख्ययिका -

    प्राचीन काळी हेमावती नगरीवर अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता. आपल्याला इंद्रपद मिळावे, असा विचार तो करू लागला. ही बातमी इंद्राला नारदमुनींकडून स्वर्गात समजली होती. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. यावेळी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गजाननाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या अवतारात जन्म घेतला  त्याने विघ्नसुराशी मोठे युद्ध केले. गजाननाच्या अफाट सामर्थ्यासमोर विघ्नसूर हरला व त्याने शरणागती पत्करली. गजाननाने त्याला आज्ञा केली, ‘ज्या ठिकाणी माझे भजन-पूजा-कीर्तन होत आहे तेथे तू जाऊ नकोस.’ तेव्हा विघ्नसुराने गजाननाला विचारले, ‘तुझ्या नावामागे माझे नाव असावे. या भागाला ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे नाव द्यावे. तेव्हा गजानन म्हणाला, “मी आजपासून ‘विघ्नेश्वर’ झालो आहे..’विघ्नेश्वर’ नामाचा जप करणाऱ्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.” त्यामुळे या ठिकाणी गजाननाला ‘विघ्नेश्वर’ किंवा ‘विघ्नहर’ हे नाव पडले. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी देवतांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझरमध्ये घडली. हेच ओझरचे ‘श्री विघ्नेश्वर विनायक’ मंदिर होय. 

★इतिहास -

   १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्री ओझर गणपती तिचे मंदिर बांधले होते

★बांधकाम -

    विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.

★उत्सव -

    भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.


★भौगोलिक -

   पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे. जवळचे रेल्वे स्थानक पुणे आहे.


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...