"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

वसुबारस

  दिवाळीचा पहिला दिवस...  

वसुबारस निमित्त आपणास व आपल्या परिवारास  मंगलमय शुभेच्छा...!

🪔स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची!🪔

वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा..!!

 🪔🛍️🪔🎁🪔🎉🪔🥀

   दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

    या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची रीत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖

नामाचे उटणे सर्वांगाला लावा

सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा...

त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम धुवून काढा

त्यागाने सर्व अंग कोरडे करा..

आनंदाची नविन वस्रे परिधान करा

प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ आणि सात्विक बनवा

अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा....

स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प.पू.गुरुदेवांच्या चरणी रहा...

।। वसुबारसेची प्रथा ।।🐄

।। धनाची पुजा ।। 🍃

।। यशाचा प्रकाश ।।☀️

।। किर्तीचे अभ्यंगस्नान ।। ☺️

।। मनाचे लक्ष्मीपुजन ।। 👏

हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची,समृद्धीची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा...!!

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

राष्ट्रीय शिक्षण दिन

  ११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  मौलाना अबुल कलाम आझाद     यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्री...