"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Wednesday, February 21, 2024

मातृभाषा दिन

 जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी

आपणा सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा...!!

    हा मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना कॅनडामध्ये राहणारे बांगलादेशी रफीकुल इस्लाम यांनी दिली. बंगाली भाषेचे  अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीही हा दिवस स्मरणात ठेवला जातो. 1952 मध्ये ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले. यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या स्मरणार्थ युनेस्कोने मातृभाषा दिनासाठी हा दिवस निवडला.

    1999 मध्ये UNESCO ने 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी UNESCO ने सन 2000 पासून दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे 2000 सालापासून हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला.

    जगभरात, भाषा हे एक साधन आहे जे लोकांना एकमेकांशी जोडते आणि त्यांची संस्कृती प्रतिबिंबित करते. देशात अनेक मातृभाषा असू शकतात. एकट्या भारतात अशा १२२ भाषा आहेत, 

Wednesday, February 7, 2024

रमाबाई आंबेडकर

   त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर

महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली... 

 !! रमाबाई आंबेडकर जन्मदिन !! 

★जन्म - ७ फेब्रुवारी १८९८ (वंणदगाव,रत्नागिरी)

★निर्वाण - २७ मे १९३५ (राजगृह,दादर)

    ★ रमाबाई भीमराव आंबेडकर ★

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी वस्तीमध्ये राहत. 

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मी देव पाहीला

       एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. ...