Tuesday, July 23, 2024

लोकमान्य टिळक

   भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक आणि जाज्वल्य देशभक्त, मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक. एक महान स्वातंत्र्यसेनानी, उत्कृष्ट वक्ते, उत्तम समाजसुधारक, आदर्शवादी असा राष्ट्रीय नेता, तसंच हिंदू धर्म, खगोलशास्त्र, संस्कृत आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध, आधुनिक भारताचे शिल्पकार असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची माहिती....


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

◆जन्म - २३ जुलै १८५६ (चिखली,रत्नागिरी)

◆स्मृती - १ ऑगस्ट १९२० (मुंबई)

   टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांचे मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके 'ओरायन' आणि 'आर्क्टिक होम ऑफ वेदाज' त्यांच्या, अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नाविन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक 'गीतारहस्य' यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. 

✧══•❁❀❁•══✧

🔹23 जुलै चंद्रशेखर आझाद यांची जयंती  संपूर्ण माहिती..

💢🔗👇👇🔗💢

✧══•❁❀❁•══✧

   टिळकांनी आगरकर, चिपळुणकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. 

Wednesday, July 17, 2024

भक्तीच्या वाटेवर  गांव तुझे लागले...
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले...

तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे...
पांडुरंगा आम्हां सर्वांवर तुझी कृपा राहू दे...!!
👣||विठू माउली||👣 
    आषाढी एकादशी 
निमित्त हार्दिक शुभेच्छा..!! 🙏

Wednesday, July 10, 2024

11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन

★जागतिक लोकसंख्या दिन★ निमित्त्य महत्त्वाची माहिती...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
★ जागतिक लोकसंख्या दिनाची सन २०२४ (या वर्षीची) थिम भावी पिढ्यांचे सक्षमीकरण: शाश्वत विकास आणि लोकसंख्या ट्रेण्ड ही आहे.

★ जगाची लोकसंख्या सन २०११ मध्ये सात अब्ज झाली होती.

★ सध्या 2024 ला जगाची लोकसंख्या ८.१ अब्ज इतकी आहे (सुमारे)

★ डिजिटल लोकसंख्या ठरवितांना जागतिक स्तरावरील जन्मदर आणि मृत्यूदर यांचा अभ्यास करून ठरविल्या जातो. भारताचा जन्मदर हा इतर देशाच्या तुलनेने खूप जास्त आहे. डिजिटल लोकसंख्या लक्षात घेता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...