"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Wednesday, July 10, 2024

11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन

निमित्त्य महत्त्वाची माहिती...

 
   1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो.

   जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला "जागतिक लोकसंख्या दिन" साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू..  लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. 

    
★ डिजिटल लोकसंख्या ठरवितांना जागतिक स्तरावरील जन्मदर आणि मृत्यूदर यांचा अभ्यास करून ठरविल्या जातो. भारताचा जन्मदर हा इतर देशाच्या तुलनेने खूप जास्त आहे. डिजिटल लोकसंख्या लक्षात घेता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

★ जागतिक लोकसंख्या वाढीमध्ये सन २०११ पासून भारताचा लोकसंख्या वाढीचा दर १७.१ इतका आहे व इतर देशांच्या तुलनेने खूप जास्त आहे.

★ लोकसंख्या वाढीचा इशारा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतामध्ये लोकसंख्येचा खऱ्या अर्थाने विस्फोट झालेला आहे आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 
   झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर ती सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. ..

No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

Happy Hormones

चार संप्रेरके जी माणसाला‌ आनंदी ठेवतात. १. एंडॉर्फिन्स २. डोपामाईन ३. सेरोटोनिन ४. ऑक्सिटोसिन 🌸 आनंदी राहायचंय? मग ही ४ "Happy Hormone...