Friday, August 30, 2024

मदर तेरेसा

 

❀ समाजसेविका मदर तेरेसा ❀
  
 एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू.
   मदर तेरेसा या कॅथोलिक होत्या मात्र त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं होतं. भारतासह त्यांना अनेक देशांच नागरिकत्व मिळालं होतं. १९४६ मध्ये त्यांनी गरीब, असहाय लेकांची सेवा करण्याचं प्रण घेतलं. निस्वार्थ सेवाभावाने त्यांनी १९५० मध्ये कोलकातामध्ये 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ची स्थपना केली होती.
★जन्म - २६ ऑगस्ट १९१० (स्कोपजे,मेसीडोनिया)
★स्मृती - ५ सप्टेंबर १९९७ (कोलकाता)

   भारतीय रोमन कॅथॉलिक नन मदर तेरेसा यांचा जन्म मेसीडोनिया मधील स्कोपजे येथे झाला. त्यांचे वडील अल्बेनियन हे दुकानदार आणि आई ही एका शेतकऱ्याची मुलगी होती. आईचा काटकपणा आणि वडिलांचा व्यवहारीपणा हे गुण मदर टेरेसा यांच्यात उतरले. अल्बेनियन यांचे कुटुंब छोटेच होते. त्यामुळे फार श्रीमंती नसतानाही मदर टेरेसा यांचे बालपण अगदी सुखा समाधानात गेले. धर्माने त्या ख्रिश्चन होत्या. वयाच्या १८व्या वर्षी ऐन तारुण्यात उंबरठ्यावर असताना सर्व संगपरित्याग करून त्या (जोगिन) मिशनरी बनल्या. त्यांनी एक वर्षभर इंग्रजी अभ्यास केला. ६ जानेवारी १९२९ रोजी त्या भारतात आल्या.

Wednesday, August 28, 2024

मेजर ध्यानचंद सिंग

  राष्ट्रीय खेल दिवस  
★ भारतीय हॉकीचे जादुगर ★ 
     🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २९ ऑगस्ट १९०५
●मृत्यू :~  ३ डिसेंबर १९७९
  मेजर ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांना हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आजही ओळखलं जातं.त्यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रात खूप मोठं योगदान दिल आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी ,त्याला प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी या साठी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. 
  

Friday, August 16, 2024

अटलबिहारी वाजपेयी

 

भारतरत्न, भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण...

◆जन्म - २५ डिसेंबर १९२४

◆मृत्यू - १६ ऑगस्ट २०१८


   हे भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते.


     नरेंद्र मोदींच्या प्रशासनाने 2014 मध्ये घोषित केले की वाजपेयींचा वाढदिवस, 25 डिसेंबर हा "सुशासन दिन" म्हणून साजरा केला जाईल . 2015 मध्ये, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती , प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान - भारतरत्न प्रदान करण्यात आला . 2018 मध्ये त्यांचे वयाशी संबंधित आजाराने निधन झाले.


    वाजपेयी पहिल्यांदा 1957 मध्ये संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले होतेभारतीय जनसंघ (BJS), भाजपचा अग्रदूत. 1977 मध्ये बीजेएसने इतर तीन पक्षांमध्ये सामील होऊन स्थापना केलीजनता पार्टी , ज्याचे नेतृत्व जुलै 1979 पर्यंत चालले. जनता सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयींनी  पाकिस्तान आणि चीनशी संबंध सुधारण्यासाठी नावलौकिक मिळवला . 

   1992 मध्ये मुस्लिम विरोधी अतिरेक्यांनी अयोध्येतील ऐतिहासिक मशिदीच्या विध्वंसाच्या विरोधात बोलणाऱ्या काही हिंदू नेत्यांपैकी ते एक होते .

    वाजपेयींनी मे 1996 मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती परंतु इतर पक्षांकडून पाठिंबा मिळवण्यात अयशस्वी झाल्यानंतर ते केवळ 13 दिवसांच्या पदावर होते. 1998 च्या सुरुवातीला ते पुन्हा पंतप्रधान झाले, 

Thursday, August 15, 2024

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन

  

🔷ज्यांनी लिहिली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेविते माथा... "भारत-भू"ला पारतंत्र्याच्या मगरमिठीतून मुक्त करणाऱ्या सर्व "देशभक्तांना" मानाचा मुजरा....!!

 स्वातंत्र्यदिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा....🌹💐जय हिंद..।।

   आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे...।।

   १५ ऑगस्ट २०२४ भारतात सगळीकडे ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम....

   बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !!

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद...!!

माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद,जय भारत...

भारत माता कि जय... वंदे मातरम्...!!

     सीमेवर प्राणपणाने देशाची राखण करून देशवासीयांना सुखासमाधानाने जगू देणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांना मानाचा मुजरा ! जय हिंद ! वंदे मातरम !नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला...!!

🔘🔘🔘🔻🔘🔘🔘

Sunday, August 11, 2024

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा

 प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावण सोमवारच्या शुभेच्छा....!

अदभुत आहे तुझी माया,

नीळकंठाची तुझी छाया,

अमरनाथमध्ये केला वास,

तुच आमच्या मनात वसलास.

हर हर महादेव…

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!


  श्रावण सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वावर अशीच राहो ही सदिच्छा.!


ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास,

ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार,

ॐ ने करा दिवसाची चांगली सुरूवात,

श्रावणी सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!


दुःख दारिद्रय नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्रावण सोमवारच्या

शुभ दिवशी तुमच्या सर्व

मनोकामना पुर्ण होवो!


श्रावण महिन्यातीला प्रत्येक वारी कोणत्या तरी देवतेची पूजा वा व्रत करण्याची परंपरा असून, श्रावण महिन्याला फार महत्व आहे. शिवभक्तीसाठी असलेला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!

शिवशंकर रहस्यमय माहिती

 

जाणून घ्या देवाधिदेव महादेव >>

   शिवाला महादेव, अर्थात सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आणि दुसऱ्या शब्दांत सर्व देवांचा देव असे म्हटलं जातं . महादेव या शब्दाचा शाब्दिक अर्थ सर्वात महान देवता किंवा सर्वश्रेष्ठ जो आदी आणि अंत आहे असा आहे. दुसरा अर्थ सर्व देवांचा नेता असाही आहे. नटराज म्हणून पूजलेले शिव या महादेव तत्त्वाचे उत्तम उदाहरण देतात.

१)"महादेव गळ्यात साप धारण का करतात?

२)"महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे?

३)"महादेवाला का प्यावे लागले विष?

४)"महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?

५)"महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे?

६)"महादेवाला तीन डोळे का आहेत?

७)"महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात?

८)"शिवलिंगावर भांग, धोत्रा धोतरा का अर्पण करतात?

९)"महादेवाला बेलाचे पान का अर्पण करतात?

१०)"भगवान शिव यांना स्मशानाचे निवासी का मानले जाते?

११)"भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?


★१)"महादेव गळ्यात साप धारण का करतात?

   महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवधेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव असे देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. 

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...