सर्वांना सुख ,समृद्धी लाभो हीच श्री गणरायाच्या चरणी मंगलमय प्रार्थना
हिंदू धर्मात कुठल्याही शुभारंभाच्या वेळी आणि मंगल कार्याच्या वेळी सर्वप्रथम ज्या देवतेचे पूजन केले जाते, ती देवता म्हणजे "गणपती". कुठलेही काम पूर्ण करण्याची शक्ती व सामर्थ्य जी देवता प्रदान करते, ती देवता म्हणजे गणपती. कुठल्याही कार्यातील अडचणी आणि विघ्न दूर करते. म्हणूनच श्री गणेशाला अग्र पूजेच्या मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आणि हे वरदान प्रत्यक्ष महादेवानेच श्री गजानानाला दिलेले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव....
स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना भारतातील जनतेवर
जातीयतेचा फार मोठा पगडा होता. आणि ही गोष्ट सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली. आणि त्यांनी हेरले की, इंग्रजांशी लढा द्यायचा असेल तर, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र यायला हवे. त्यांनी गीतेचा गाढा अभ्यास केलेला असल्यामुळे , सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवासारखा इतर दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. आणि सर्वप्रथम इ.स. १८९३ साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच जण जात-पात विसरून, एकत्र येऊन, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागले.आणि या संघटित होण्याचा , एकजुटीचा फायदा बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी चांगल्या प्रकारे करून घेतला. आणि अशा प्रकारे भारत देश स्वतंत्र होण्यासाठी गणपती बाप्पाचा ही खारीचा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
आज सबंध भारतात तर सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोच., परंतु जे भारतीय बांधव उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालेले आहेत., त्यांनी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवलेली दिसून येते .अर्थात ते ज्या देशात स्थायिक झालेले आहेत, त्या त्या देशात ही सार्वजनिक गणेशोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते.
No comments:
Post a Comment