The Constitution...
SUTRASANCHALN TABS
- Home
- महात्मा गांधी
- संभाजी महाराज
- राजमाता जिजाऊ
- सूत्रसंचालन नमुना
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज
- लोकमान्य टिळक
- शहीद दिवस
- वाचन प्रेरणा दिन
- डॉ.आंबेडकर शायरी/चारोळ्या
- मदर्स डे
- वि.दा.सावरकर
- स्वातंत्र्य दिन पूर्व तयारी
- युगपुरुष स्वामी विवेकानंद
- अष्टविनायक गणपती दर्शन
- सेवालाल महाराज जयंती
- महाराष्ट्र दिन
- रमाबाई आंबेडकर
- लाल बहादूर शास्त्री
- शिवाजी महाराज जयंती
- गुरुपौर्णिमा
- महिला-दिन
- प्रजासत्ताक दिन
- शिक्षक दिन -डॉ. राधाकृष्णन जयंती
- जयंती व राष्ट्रीय दिन
- स्पर्धा परीक्षा तयारी सर्व विषय
Monday, November 24, 2025
भारतीय संविधान दिवस – 26 नोव्हेंबर
Friday, November 14, 2025
पंडित जवाहरलाल नेहरू
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते ते स्वतंत्र भारताचे महान पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रवास ही आधुनिक भारताच्या जडणघडणीची एक यशस्वी कहाणी आहे. पारतंत्र्यातून नुकत्याच मुक्त झालेल्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि सहिष्णुतेच्या आदर्श मूल्यांनी अलंकृत केले.
अवघी १२% साक्षरता असलेल्या भारताला त्यांनी IIT, IIM आणि AIIMS सारख्या शिक्षण संस्थांची देणगी दिली. भाक्रा-नांगल धरणासारखी अनेक 'आधुनिक भारताची मंदिरे' त्यांनी उभारली. आपल्या संशोधनातून आणि तांत्रिक प्रगतीतून जगाला अचंबित करणाऱ्या भारताच्या वैज्ञानिक संस्था या नेहरूंच्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपाक आहेत.
Tuesday, November 04, 2025
आजच्या जगात पहिल्या क्रमांकाची शिक्षणव्यवस्था
*फिनलँड* उत्तर युरोपातला एक देश. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख. इथली शिक्षणव्यवस्था जगावेगळी आहे. जगातली ती सर्वात चांगली शिक्षणव्यवस्था मानली जाते.
*फिनलँड शंभर टक्के साक्षर देश* आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. त्यांच्यात नापास होण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य असतं. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, तर त्या संस्थेच्या निकषांत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.
या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. सर्वांसाठी ते उपलब्ध आहे आणि अनिवार्यसुद्धा. या देशातला प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तकं आणि लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तिथलं सरकार चालवतं आणि सर्व खर्च सरकार उचलतं. या देशात एकही शाळा खाजगी नाही.
-
मित्राच्या केस मध्ये ही लक्षणे सत्य ठरले... लगेच उपचार मिळाल्यामुळे पुढील धोका टळला... आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या ...
-
सुखाची अपेक्षा असेल.... तर दुःख ही भोगावे लागेल... प्रश्न विचारावयाचे असतील... तर उत्तर हि द्यावे लागेल...!! हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच...
-
अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात . महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन ...
धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार
महामानवाचे महापरिनिर्वाण
दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. ...




