महागणपती रांजणगावचा

 आठवा गणपती – रांजणगावचा महागणपती 

    महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील आठवा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो..
   पुण्याजवळ रांजणगाव येथे महागणपती मंदिर आहे. हे मंदिर ९-१०व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे. येथील गणपतीची मूर्ती महोत्कट या नावानेही ओळखली जाते. एका मान्यतेनुसार या मंदिरातील मूळ गणेशमूर्ती परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी तळघरात लपवून ठेवण्यात आली आहे.
   बप्राचीन काळी ग्रीत्समद नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले. ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते गणेशाचे परम भक्त होते. एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला. त्यांनी त्याला आपला मुलगा मानले. “मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवीन,” असे तो मुलगा म्हणाला. मग ऋषींनी त्याला “गणानां त्वां’ हा गणेशमंत्र सांगितला. मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली. त्याने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची तीन नगरे दिली. ‘भगवान शिवाशिवाय या त्रिपुराचा कोणीही नाश करणार नाही. भगवान शिव एका बाणाने या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही मुक्त व्हाल. असा वर दिला.
श्रीगणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्रिपुरासूराला मारण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुरस मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले; पण ते त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, ‘युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाहीत. त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टश्लोकोत्तम स्तोत्र ‘प्रणाम्य शिरसा देवं” सांगितले.. त्या स्तोत्राने महादेव गणेशाची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि ‘मी गणेश आहे’ असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवांनी त्रिपुरासुरवर विजय मिळावा असा वर मागितला. तेव्हा श्रीगणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर (रांजणगाव) म्हणतील असे सांगून श्रीगणेश अदृश्य झाले.
त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासुर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासूरचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली; म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरासुराशी युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा केली. तोच हा रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती आहे.
★मंदिर-
   येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे(की तळघरात?) असल्याचे सांगितले जाते. तिला मोहोत्कट असे म्हणले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.

★भौगोलिक-
   पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे..

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...